Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवद आश्रमातील साधक श्री. कृष्णा आय्या यांना ६१ टक्के पातळीचे रंजन देसाईकाका यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१. वाक्पटुत्व
     देसाईकाकांमध्ये बोलण्याचे कौशल्य होते. ते समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे योग्य पद्धतीने समजावून सांगत आणि समोरच्या व्यक्तीला ते लगेच पटत असे.
२. स्वभाव तापट असूनही साधकांविषयी मनात पूर्वग्रह नसणे
   देसाईकाकांचा स्वभाव तापट होता, तरी त्यांच्या मनात साधकांविषयी कसलाही पूर्वग्रह नव्हता. ते राग आल्यावर रागवायचे आणि लगेच सहजतेने बोलायचे. त्यांच्यात सर्व सहसाधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव होता. 
३. स्थिरता
    काकांचे आजारपण गंभीर असूनही ते मनाने स्थिर रहात. ते प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून निश्‍चिंत असत. प.पू. गुरुदेवांनी सर्वकाही दिले आहे. त्यांच्यामुळे आज मी स्थिर राहू शकतो, असे ते नेहमी सांगत.
४. समर्पणभाव
   देसाईकाकांना कशाचीही आसक्ती नव्हती. ते साधनेत प्रगती होण्याविषयी काळजी करायचे नाहीत. प.पू. डॉक्टरांविषयी त्यांचा समर्पणभाव असल्याचे लक्षात येत असे.
५. वडीलबंधूप्रमाणे आधार देणारे व्यक्तीमत्त्व
    साधकांना सेवेसंबंधी त्यांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य मिळायचे. त्यांचे देहावसान झाल्यानंतर आम्हा वाहन सेवा करणार्‍या साधकांना वडीलबंधूप्रमाणे आधार देणार्‍या व्यक्तीमत्त्वाला मुकल्यासारखे वाटले.
- श्री. कृष्णा दत्तात्रेय आय्या, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn