Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जळगाव शहरातील विविध हिंदु समाजाच्या प्रमुखांचा हिंदु धर्मजागृती सभेला जाहीर पाठिंबा !

बारा बलुतेदार समाजाचे श्री. चंद्रकांत सोनवणे (उजवीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते
चांभार समाजाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर कापडे (डावीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते
      जळगाव - येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण बारा बलुतेदार, नाभिक समाज महासंघ, चांभार समाज, क्षत्रिय मराठा समाज, आदर्श मराठा समाज यांना देण्यात आले. नाभिक महासंघाचे संपर्क प्रमुख श्री. राजकुमार गवळी यांनी स्वत: सभेच्या पहिल्या बैठकीपासून सक्रीय सहभाग घेत शहरातील सर्व समाजाच्या प्रमुखांना भेटण्याचे नियोजन केले. सर्वांनी सभेला पाठिंबा दर्शवला. नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री. किशोर सूर्यवंशी आणि समाज सदस्य यांनाही सभेचे निमंत्रण देण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn