Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त काढलेल्या विशेषांकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
१. आदल्या रात्री विशेषांक वाचल्यावर निर्गुणाची 
(विशेषांकाची) सगुणातून पूजा करूया, असे ठरवणे 
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढलेला विशेषांक २८.५.२०१६ च्या रात्रीच घरी आला होता. मी त्या रात्रीच तो अंक पूर्ण वाचला. अंक पाहून मनात विचार आला, आज केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच निर्गुण तत्त्वाची सगुणातून अनुभूती घेण्याची संधी आली आहे. त्यानंतर मी देवाने दिलेल्या निर्गुणाची (विशेषांकाची) सगुणातून उद्या पूजा करूया, असे ठरवले.
२. पूजा केलेल्या विशेषांकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात 
जिवंतपणा जाणवणे आणि पूजा केलेल्या अन् अन्य अंकांतील 
पूजा न केलेले छायाचित्र यांत पुष्कळ अंतर असल्याचे ध्यानी येणे 
सौ. मानसी राजंदेकर
     मी दुसर्‍या दिवशी सकाळी देवपूजा केल्यावर विशेषांकाचीही पूजा केली. पूजेनंतर मी तो अंक देवघरात ठेवला. संध्याकाळी मी देवाजवळ दिवा लावतांना त्या अंकाकडे पाहिले, तर अंकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवत होता. तो अंक नसून प्रत्यक्ष प.पू. डॉक्टर तिथे आहेत, असे मला जाणवले. मी अंक जवळ घेऊन बघितला, तर प.पू. डॉक्टरांच्या सभोवती असलेला पिवळा प्रकाश गडद झाला असून तो अधिक पसरला आहे, असे माझ्या लक्षात आले. नंतर मी माझ्याकडील दुसरा विशेषांक घेऊन पाहिला. पूजा केलेला आणि पूजा न केलेला विशेषांक यांतील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रांत पुष्कळ अंतर असल्याचे माझ्या लक्षात आले. 
     हे गुरुमाऊली, मी अज्ञानी आहे. मला काहीच कळत नाही. देवा, तुझ्या कृपेने येणार्‍या अनुभूती तुझ्या चरणी अर्पण करत आहे. देवा, तू मला सतत माझ्यासमवेत असल्याची आणि आनंदाची अनुभूती देत आहेस. यासाठी मी तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
- सौ. मानसी राजंदेकर, पुणे (३.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn