Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी जयपूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी ‘कोलावरी डी’च्या नावाने पुस्तिका काढली !

विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी वर्तमान शिक्षणपद्धती कारणीभूत आहे. 
ती न पालटता वरवरचे मानसिक स्तरावरील उपाय करून काय साध्य होणार ?
     जयपूर (राजस्थान) - शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेले ‘कोलावरी डी’ या गाण्याच्या नावाने येथील जिल्हाधिकारी रवी कुमार सुरपूर यांनी छोट्या पुस्तिका काढल्या आहेत. या पुस्तिकांच्या माध्यमातून कोटा येथील एका शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. केवळ २० पृष्ठांच्या या पुस्तिकांमध्ये विद्यार्थ्यांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तिकेत चित्रपटांतील प्रसिद्ध संवाद, मोठे तत्त्वचिंतक यांचे विचार आणि काही दृष्टीकोन दिले आहेत. (हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तीमत्त्व विकास होईल, अशा प्रकारचे शिक्षण देण्यात येईल. तसेच त्यांच्यात आत्मबळ निर्माण होण्यासाठी त्यांना साधना आणि धर्माचरण शिकवण्यात येईल. त्यामुळे ते जीवनातील कोणत्याही समस्येला धैर्याने सामोरे जाण्यास सिद्ध होतील ! - संपादक)
विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासंबंधी या पुस्तिकेत दिलेले काही उपाय 
१. जी मुले त्यांच्या कुटुंबातील आठवणीमुळे त्रस्त असतात, त्यांना केवळ घरी १ दूरभाष करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
२. आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी सलमान खानचा चित्रपट ‘वॉन्टेड’मधील संवाद या पुस्तिकेत देण्यात आला आहे. 
३. जे विद्यार्थी परिक्षेच्या तणावामुळे त्रस्त असतात, त्यांच्यासाठी आर्य चाणक्य यांच्या सुविचारांचा उपयोग करण्यात आला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn