Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
     ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’
१७.१२.२०१६ - चेन्नई, तमिळनाडू
३. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना गणपतीचे दर्शन घ्यायला सांगणे आणि ते घेतल्यानंतर रात्री झालेल्या नाडीवाचनात महर्षींनी गणपतीने प्रसन्न होऊन दिव्य दर्शन अन् आशीर्वाद दिल्याचेही सांगणे
     संकष्ट चतुर्थीनिमित्त आज सायंकाळी ७ वाजता मला गणपतीचे दर्शन घ्यायला सांगितले होते. तेव्हा मी मंदिरातील पुजार्‍यांना अभिषेक करायला सांगून साधकांच्या रक्षणासाठी गणपतीला प्रार्थना केली. दर्शन घेतल्यावर रात्री पुन्हा नाडीवाचन झाले. त्यामध्ये महर्षींनी सांगितले, ‘तुमचे आजचे गणपतीचे दर्शन भावपूर्ण झाले. तुम्हाला गणपतीने दिव्य दर्शन देऊन आशीर्वाद दिले.’
४. आपत्काळात रक्षण होण्यासाठी साधकांना सांगितलेले काही उपाय
     महर्षींनी साधकांना परम गुरुजींवर दृढ श्रद्धा तर ठेवायला सांगितलीच आहे. त्याबरोबरच ‘पुढील गोष्टी साधकांच्या घरी असतील, तर आणखी चांगले’, असेही महर्षि म्हणाले.
अ. साधकांच्या घरी लहान कुंडीत कडुलिंब आणि पिंपळ यांचे छोटे रोप हवे. या रोपांमध्ये नैसर्गिक आपत्ती थोपवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे.
आ. साधकांच्या घरी ‘सनातन पंचांग’ ही दिनदर्शिका असावी.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn