Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सिंगापूर येथील श्रीमती सँडी योंग स्वी फोंग यांच्या साधनेचा प्रवास आणि त्यांना रामनाथी आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती

श्रीमती सँडी
योंग स्वी फोंग
१. साधनाप्रवास
१ अ. विविध माध्यमांतून साधना करतांना आयुष्यात रिक्तपणा जाणवणे, स्वभावदोष आणि निर्मूलनासाठी कोणाकडूनही मार्गदर्शन न मिळणे आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्यावर त्यासाठी प्रायोगिक स्तरावर उपाय सापडणे : सँडी योंग स्वी फोंग या सिंगापूरच्या आहेत. त्यांनी ख्रिस्ती पंथाचा अभ्यास केला असून त्या ध्यानधारणा करतात. त्यांनी प्राणिक हिलिंग या आध्यात्मिक उपायपद्धतीनुसार इतरांवर उपायही केले आहेत. असे असले, तरी त्या नेहमी खर्‍या अध्यात्माच्या शोधात होत्या. त्या वेगवेगळ्या माध्यमांतून साधना करत असल्या, तरी त्यांना त्यांच्या आयुष्यात एक रिक्तपणा वाटत असे. स्वतःमध्ये पुष्कळ स्वभावदोष असल्याची त्यांना जाणीव झाली. बौद्ध पंथानुसार साधना करतांना त्यांना स्वतःतील अहं न्यून करणे आवश्यक आहे, हे समजले; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करायचे, याविषयी प्रायोगिक स्तरावर त्यांना कोणाकडूनही मार्गदर्शन मिळाले नाही. साधना करताकरता अहं वाढत असल्याची त्यांना जाणीव होऊ लागली. याविषयी साहाय्य मिळण्यासाठी त्या भक्तीभावाने प्रार्थना करू लागल्या. त्या नास्तिक होत्या; मात्र ईश्‍वराला समजून घेण्यासाठी त्या ईश्‍वराकडे साहाय्य मागू लागल्या. माहितीजालावर शोध घेतांना त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्या. त्यांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करायचे, याविषयी प्रायोगिक स्तरावर उपाय सापडला.
१ आ. ध्यान करण्यापेक्षा नामजप केल्याने अधिक लाभ होत असल्याची प्रचीती येणे : आरंभी बसून दत्ताचा नामजप करणे त्यांना कठीण जात होते. त्या वेळी त्यांनी ध्यान करणे आणि संकेतस्थळावरील माहिती वाचणे, यांना प्राधान्य दिले; परंतु आता नामजपामुळे होणारा लाभ त्या अनुभवत आहेेत. ध्यान करण्यापेक्षा नामजप केल्याने अधिक लाभ होतो, याची त्यांना प्रचीती येत आहे. 
१ इ. अध्यात्मात प्रगती करून संतपद प्राप्त करण्याची इच्छा असणे : त्यांना अध्यात्मात प्रगती करायची आहे. या उद्देशानेच त्या या कार्यशाळेला आल्या आहेत. एक दिवस त्यांना संतपद प्राप्त करायचे आहे. या कार्यशाळेतून या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल चालू होईल, अशी त्यांना आशा आहे.
१ ई. लेखांचे भाषांतर करणे, प्रसार करणे, प्रवचने घेणे आदी सेवा करणे : सँडी साधनेसाठी मनापासून प्रयत्न करतात. त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगाला जातात. त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या लेखांचे चिनी भाषेत भाषांतर करण्याची सेवा नियमित करत आहेत. त्यांच्यावर एका मुलाची जबाबदारी असूनही अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या प्रवचनांची सेवा करतात. त्यांच्यात नेतृत्व, इतरांप्रती प्रेम, संघटितपणा आणि साधकत्व हे गुण प्रकर्षाने जाणवतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती त्यांना पुष्कळ आदर आहे. कार्यशाळेेसाठी आश्रमात येण्यासाठी त्यांनी बर्‍याच इतर साधकांनाही साहाय्य केले आहे. या कार्यशाळेसाठी सिंगापूरहून ५ साधक आले आहेत.
- सौ. श्‍वेता क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय 
२. रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी झालेले त्रास आणि आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती 
२ अ. आश्रमात येण्यापूर्वी झालेले त्रास आणि त्यावर केलेले उपाय : आश्रमात येण्याच्या आदल्या रात्री माझी दृष्टी धूसर झाली. माझ्या डोक्यावर दाब जाणवत होता. मी मीठ-पाण्याचे उपाय केले आणि ४५ मिनिटे नामजप केला. मला होणार्‍या त्रासाविषयी एका कागदावर लिहून तो कागद जाळला. असे मी दोनदा केले. त्यानंतर माझा त्रास त्वरित उणावला. मी ईश्‍वराला प्रार्थना केली, मी माझा संपूर्ण देह तुझ्या चरणी अर्पण करत आहे. देवाला भेटायचे आहे. तूच मला गोव्याला घेऊन चल. गोव्यापर्यंतचा माझा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे.
२ आ. नामजप करतांना देह शुद्ध होऊन देहातून शक्ती प्रवाहित होत असल्याचे जाणवणे : एक संत पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करतांना माझा देह शुद्ध झाल्याचे आणि देहातून शक्ती प्रवाहित होत असल्याचे जाणवले.
२ इ. दोन रात्री झोपल्यावर पाठ दुखणे आणि त्याविषयी सर्व देवावर सोपवल्यावर तिसर्‍या रात्री पाठीवर कोणीतरी उपाय करत असल्याचे जाणवून नंतर पाठदुखी थांबणे : १० आणि ११.१२.२०१६ या दिवशी रात्री खोलीत झोपल्यानंतर गादीच्या कडकपणामुळे मला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. तिसर्‍या रात्री मी स्वतःला समजावले की, याविषयी मला अजिबात तक्रार करायची नाही. मला सवय करायची आहे. मी सर्व देवावर सोपवले. त्या रात्री झोपल्यानंतर माझ्या पाठीवर कोणीतरी उपाय करत असल्याचे जाणवले आणि माझी पाठदुखी थांबली. 
२ ई. कार्यशाळेत पू. सिरियाक वाले आणि श्री. डियान ग्लेचिश प्रोजेक्टर पटलाच्या उजवीकडे बसले असतांना मला त्यांची उंची वाढून जणु ते प्रत्यक्ष देव झाले आहेत, असे जाणवले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद जाणवत होता.
२ उ. गुरुकृपायोगानुसार साधनेविषयीच्या सत्राच्या वेळी डाव्या कानात उच्च स्वरात एक नाद सतत ऐकू येणे आणि दुसर्‍या दिवशी जेथून नाद ऐकू आला, तेथे दैवी कण दिसणे : गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी सत्र चालू झाल्यावर माझ्या डाव्या कानात उच्च स्वरात एक नाद सतत ऐकू येत होता. माझा डावा कान ध्वनीक्षेपकाच्या (स्पिकर) बाजूने होता. दुसर्‍या दिवशी ज्या ठिकाणाहून मला नाद ऐकू आला होता, त्याच्या जवळ दैवी कण दिसले.
२ ऊ. एरव्ही स्वतःभोवती पिवळ्या रंगाचे काही हालतांना दिसणे आणि आश्रमदर्शन करतांना ते चैतन्य किंवा दैवी कण असल्याची जाणीव होणे : श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्‍वेता क्लार्क आश्रमदर्शन करत असतांना मला जाणीव झाली, माझ्याभोवती बर्‍याच वेळा पिवळ्या रंगाचे काहीतरी हलत असते आणि मी त्याकडे दुर्लक्ष करते. त्या वेळी वाटायचे, मला माझ्या दृष्टीतच दोष आहे; मात्र आज मला जाणीव झाली, मला दिसणारे ते चैतन्य किंवा दैवी कण आहेत. गेल्या एक वर्षापासून मला देवतांची चित्रे दिसत. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र हलतांना दिसत असे. त्यांचा स्मित असणारा तोंडवळा दिसत असे आणि त्यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवत असे. 
२ ऐ. आश्रमाच्या भिंतीवर तळहात आणि डोके ठेवल्यावर चांगली शक्ती अन् प्रेम देहात प्रवाहित होत असल्याचे जाणवणे : आश्रमाच्या भिंतीवर माझे तळहात आणि डोके ठेवल्यावर मला चांगली शक्ती अन् प्रेम माझ्या देहात प्रवाहित होत असल्याचे जाणवले. ही शांत अन् आनंद देणारी अनुभूती होती.
- श्रीमती सँडी योंग स्वी फोंग, सिंगापूर (१३.१२.२०१६) 
एस्.एस्,आर्.एफ्.च्या साधकांविषयीचे मत 
१. एस्.एस्,आर्.एफ्.चे साधक प्रेमळ आहेत. सौ. श्‍वेता क्लार्क या आईप्रमाणे वाटत असून असे प्रेम मी यापूर्वी कधीच अनुभवले नाही.
२. आतापर्यंत प्रथमच इतके नम्र (अल्प अहं असलेेले) आणि प्रेमळ मार्गदर्शक भेटले आहेत.
- श्रीमती सँडी योंग स्वी फोंग, सिंगापूर
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn