Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

युरोपमधील स्लोव्हाकियामध्ये इस्लामला धर्म म्हणून मान्यता नाही !

     ब्रॅटीस्लाव्हा (स्लोव्हाकिया) - स्लोव्हाकिया हा युरोपियन युनियनचा सदस्य देश आहे. युरोपियन युनियनमधील इतर देशांना सिरीया आणि इतर युद्धपीडित देशांतील किती शरणार्थी मुसलमानांना आश्रय द्यायचा याविषयीचा कोटा आखून देण्यात आला आहे. तसाच कोटा स्लोव्हाकिया देशालाही देण्यात आला होता. स्थलांतरितांसाठी असणार्‍या कोट्याकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणार्‍या लोकांना राज्यात सामवून घेण्यास कडाडून विरोध केला जात आहे. त्यासाठी इस्लामला ‘धर्म’ म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी इस्लाम धर्माला स्लोव्हाकियामध्ये स्थान नसल्याचे विधान सतत केले आहे. 
     पूर्वीच्या जनगणनेनुसार केवळ २ सहस्र अनुयायी असलेेल्या आणि मान्यताप्राप्त मशीद नसलेल्या इस्लाम धर्माला स्लोव्हाकियात बस्तान बसवायला अतिशय कठीण जाणार आहे. इस्लामिक फाऊंडेशननुसार सध्या स्लोव्हाकियात ५ सहस्र मुसलमान आहेत.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn