Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शबरीमला यात्रेवरून परतणार्‍या संघ कार्यकर्त्याच्या मुलावर धर्मांधांचे आक्रमण !

केरळमधील कम्युनिस्टांच्या राज्यांत हिंदु यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमण होते आणि
देशातील एकही पुरो(अधो)गामी अन् निधर्मी त्याविरोधात बोलत नाही, हे लक्षात घ्या ! धर्मांधांच्या अशा आक्रमणांंमुळे देशात असहिष्णुता वाढली आहे, हे हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी सांगायला हवे !
     पेरुंपडप्पू (मलप्पुरम्) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आयरूर थोट्टाथील वेलयुधन यांचे पुत्र श्री. मिथुन (वय २३ वर्षे) हे शबरीमला यात्रेवरून घरी परततांना त्यांच्यावर ३ धर्मांधांनी आक्रमण केले. त्यांनी श्री. मिथुन यांना अमानुष मारहाण केली. (केरळमध्ये हिंदु यात्रेकरूंवर आक्रमण व्हायला ते भारतात आहेत कि पाकिस्तानात ? - संपादक) श्री. मिथुन त्यांच्या मित्रांसह तीर्थम् कलावेदी बसस्थानकावर बसची वाट पहात थांबला होते. त्या वेळी ३ धर्मांध तेथे आले आणि चौकशी करण्याचे निमित्त करून श्री. मिथुन यांच्यावर तलवारीने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मिथुन यांनी हे वार हातावर घेतल्याने त्यांचा हात छाटला गेला. लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याने धर्मांधांनी तेथून पळ काढला, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. श्री. मिथुन यांना तातडीने थ्रिसुर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयात हालवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास चालू आहे. शबरीमला यात्रेकरूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी श्री. मिथुन यांची हत्या करण्याचा धर्मांधांचा डाव होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn