Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गोहत्या आणि धर्मांतराला विरोध करणार्‍या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची ख्रिस्त्यांनी नक्षलवाद्यांकडून केलेली हत्या आणि पोलिसांनी केलेले दुर्लक्ष !

अधिवक्ता
नागेश ताकभाते
१. स्वामी लक्ष्मणानंद यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगून 
लोकांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे आणि आमीष 
दाखवून धर्मांतर करणार्‍या पाताळयंत्री ख्रिस्ती धर्मगुरु 
अन् नक्षलवादी यांचे खरे रूप समाजासमोर आणणे 
     ‘श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, म्हणजे २३.८.२००८ या दिवशी जालेशपेटा (ओडीशा) येथील ७२ वर्षीय वेदांत केसरी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती, अमृतानंदजीबाबा, माता भक्तीमाई, किशोरीबाबा आणि रक्षक पुरंजन घंटा यांची दिवसाढवळ्या त्यांच्या आश्रमात घुसून निर्दय हत्या करण्यात आली. स्वामी लक्ष्मणानंद यांनी ओडीशा राज्यात अनेकविध कार्य आरंभले होते, उदा. धर्मांतरित झालेल्यांसाठी शुद्धीकरण मोहिमा, गोहत्या रोखणे, राष्ट्रप्रेम जागृत करणे. त्यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगून लोकांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त केले. स्वामीजींनी त्यांचे पूर्ण आयुष्य आदिवासी लोकांच्या सेवेत समर्पित केले होते. विशेष म्हणजे ते आदिवासी लोकांना खोटे आमीष दाखवून धर्मांतर करणारे पाताळयंत्री ख्रिस्ती धर्मगुरु आणि नक्षलवादी यांचे खरे रूप समाजासमोर आणत होते.
२. स्वामींनी आदिवासी समाजाचा मागासलेपणा दूर 
करण्यासाठी भरीव कार्य हाती घेणे आणि त्यामुळे धर्मांतरित होणारा 
आदिवासी समाज सावध होऊन धर्मांतरणापासून दूर राहू लागणे अन् याची चीड 
मनात धरून ख्रिस्ती धर्मगुरूंनी माओवाद्यांच्या साहाय्याने स्वामींची हत्या करणे 
     आदिवासी समाजाचा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठीही स्वामीजींनी भरीव कार्य हाती घेतले. त्यामुळे तेथील आदिवासी लोकांचे ते एक आधारस्थान झाले होते. यामुळे स्थानिक ख्रिस्ती धर्मगुरु पैशांच्या बळावर आणि फसवे आश्‍वासन देऊन माओवाद्यांच्या सहकार्याने धर्मांतरित होणारा आदिवासी समाज सावध झाला आणि धर्मांतरणापासून दूर राहू लागला, याची चीड मनात धरून ख्रिस्ती धर्मगुरूंंनी माओवाद्यांच्या साहाय्याने स्वामींची हत्या केली. (हिंदु धर्मासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या तपस्वींचे संरक्षण हिंदू बहुल देश करू शकत नाही, हे सत्य हिंदूंनी ओळखले पाहिजे. - संकलक)
३. कंधमल जिल्ह्यात स्वामींजीची हत्या करण्याविषयीची पत्रे वाटणे आणि 
जिल्हा प्रशासनाला कल्पना असूनही ते स्वामींचे प्राण वाचवण्यासाठी अपयशी ठरणे 
     ऑगस्ट २००८ मध्ये कंधमल जिल्ह्यात स्वामींजीची हत्या करण्यात येणार असल्याची पत्रे संपूर्ण जिल्ह्यात वाटण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाला ‘स्वामींची हत्या होणार आहे’, याची कल्पना होती, तरीही स्वामींचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले किंबहुना ‘प्रयत्नच झाले नाहीत’, असे म्हणावे लागेल.
४. आश्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त फुलांच्या माळा लावण्याची सेवा चालू 
असणे आणि २० ते २५ बंदुकधारी आश्रमात घुसून त्यांनी अंदाधुंद गोळीबार करणे
     २३.८.२००८ या दिवशी सकाळी ७.५५ वाजता स्वामीजींच्या आश्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमीची सिद्धता चालू होती. सर्व आश्रम सजवला जात होता. फुलांच्या माळा लावण्याची सेवा चालू होती. याच वेळी २० ते २५ बंदुकधारी आश्रमात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार चालू केला. या नराधमांनी पंधरा मिनिटांच्या आत ५० पेक्षा अधिक फेरी झाडल्या आणि रक्ताचे पाट वाहू लागले. या गोळीबारात स्वामी लक्ष्मणानंद, त्यांचे शिष्य अमृतानंद, माता भक्तीमाई, किशोरीबाबा आणि पुरंजन घंटा यांचा जागीच मृत्यू झाला. 
५. निकाल घोषित करतांना हत्येमागील पार्श्‍वभूमी आणि उद्देश गोहत्या आणि धर्मांतराला 
असणारा स्वामीजींचा विरोध यांमुळे ख्रिस्ती धर्मगुरूंनी माओंसमवेत कट रचून हत्या केल्याचे स्पष्ट होणे 
     सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला दिल्यावर प्रशासनाने नेहमीप्रमाणे घटना घडून गेल्यावर हालचाल केली. हिंदूंच्या रोषामुळे मोठी दंगल उसळली आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे प्रकरण ‘क्राईम ब्रांच’कडे सोपवण्यात आले. आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि त्याची सत्यता न्यायालयात सिद्ध झाली. हाती आलेल्या पुराव्यांवरून या खटल्याचा निकाल ३०.९.२०१३ या वर्षी (५ वर्षांनी !) अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय फुलबनी यांनी घोषित केला. यात ६ आरोपींना शिक्षा दिली गेली. निकाल घोषित करतांना त्यांनी या हत्येचा उद्देश आणि पार्श्‍वभूमी निकालात स्पष्ट दिली आहे, ‘गोहत्या आणि धर्मांतराला असणारा स्वामीजींचा विरोध यांमुळे ख्रिस्ती धर्मगुरूंनी माओवाद्यांसमवेत कट रचून स्वामींची हत्या केली.’
६. २० ते २५ बंदुकधार्‍यांनी आश्रमावर सशस्त्र आक्रमण 
करूनही केवळ सात आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल होणे आणि 
कटाचे सूत्रधार पडद्याआड असल्याचे निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात करणे 
     हत्येचा तपास करतांना या प्रकरणातील भयानक सत्यता न्यायालयात समोर आली. स्वामीजींची हत्या हा पूर्वनियोजित कट असून हत्येमागे ख्रिस्ती धर्मगुरु आणि माओवाद्यांचा हात असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. (नक्षलवादाला खतपाणी कोणाचे मिळत आहे, हे यावरून सिद्ध होते. - संकलक) सदर खटल्यात आरोपपत्र दाखल झाले आहे; परंतु त्याचा तपास आजही खुला आहे. २० ते २५ बंदुकधार्‍यांनी आश्रमावर सशस्त्र आक्रमण केले, तरी केवळ सात आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांवरून या हत्येच्या मागे असलेल्या सर्व आरोपीपर्यंत तपासयंत्रणा पोचू शकल्या नाहीत आणि अजूनही कटाचे सूत्रधार पडद्याआड असल्याचे निरीक्षण न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात केले आहे. 
७. पोलीस संरक्षण असतांनाही स्वामीजींची हत्या होणे 
आणि स्वामीजींच्या हत्येनंतर दोन ते तीन दुचाकीस्वारांनी 
गावात येऊन स्वामीजींच्या हत्येविषयी काहीही न सांगण्याविषयी हिंदूंना 
धमकी देणे अन् खटल्यातील अनेक साक्षीदार घाबरले असल्याचे समोर येणे 
     घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. राज्य पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणेला ‘स्वामीजींवर आक्रमण होऊ शकते’, याची माहिती होती. त्यांना पोलिसांनी संरक्षणही दिले होते, तरीही स्वामीजींची दिवसाढवळ्या हत्या झाली. (पोलीस हिंदु संतांची काय किंमत ठेवतात आणि त्यांना कोणत्या दर्जाचे संरक्षण देत असतील, याची यातून कल्पना येते. - संकलक) घटनेच्या एक मासापूर्वी (महिन्यापूर्वी) गोहत्येच्या विरोधात स्वामीजींनी पोलीस तक्रार केली होती. स्वामीजींच्या हत्येनंतर दोन ते तीन दुचाकीस्वारांनी गावात येऊन ‘स्वामीजींच्या हत्येविषयी पोलिसांना काही सांगू नये अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील’, अशी हिंदूंना धमकी दिली होती. या खटल्यात अनेक साक्षीदार घाबरले असल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलीस यंत्रणांचा कारभार कसा आहे, हे आपल्याला लक्षात येते.
८. स्वामीजींचे धर्मप्रबोधन आणि धर्मांतराला असणारा 
विरोध यांमुळे ख्रिस्ती धर्मगुरू त्यांच्या विरोधात असणे 
     ख्रिस्ती धर्मगुरु स्वामीजींच्या विरोधात होते आणि त्यांच्यावर २००७ या वर्षी ख्रिस्त्यांनी जीवघेणे आक्रमण केले होते; परंतु त्यात ते वाचले होते. स्वामीजींचे गरीबांसाठीचे कार्य हे धर्मगुरूंना बोचत होते. स्वामीजींचे धर्मप्रबोधन आणि त्यांचा धर्मांतराला असणारा विरोध यांमुळे ख्रिस्ती धर्मगुरु स्वामींच्या विरोधात होते. 
९. ‘बेतीकोल डेरिष कौन्सिल चर्च’ यांनी ख्रिस्ती 
धर्मगुरूंच्या कार्यात अडथळा ठरणार्‍या व्यक्तीला शिक्षा करायची ठराव 
बैठक घेणे आणि स्वामींच्या हत्येनंतर चर्चमध्ये मिठाई वाटून आनंददिवस साजरा करणे 
     ‘बेतीकोल डेरिष कौन्सिल चर्च’ यांनी ‘ख्रिस्ती धर्मगुरूंच्या कार्यात अडथळा ठरणार्‍या व्यक्तीला शिक्षा करायची’, असा ठराव बैठकीत केला होता. या ठरावात असेही म्हटले होते, ‘शत्रूच्या हत्येनंतर प्राप्त यशाचे स्मरण करीत ‘ख्रिश्‍चन सेलीब्रेशन दिवस’ साजरा करण्यात यावा.’ सदर ठरावाप्रमाणे स्वामीजींच्या हत्येनंतर कोटघय येथील चर्चमध्ये मिठाई वाटण्यात आली आणि आनंददिवस साजरा केला. (यांना शांतीचे पुजारी म्हणावे का हिंसेचे खंदे सर्मथक ? - संकलक) या ठरावाची प्रत न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी ख्रिस्ती आहेत. आरोपींनी हत्या केल्यानंतर घटनास्थळी पत्र टाकले होते, या पत्रात स्वामीजींना खुनाची धमकी दिली होती.
१०. चर्च संस्थानांनी हत्यार्‍यांची बाजू उघडपणे घेणे 
    न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावरही विविध चर्च संस्थानांनी आरोपींच्या बाजूने गळे काढले. ‘सर्व आरोपी गरीब ख्रिस्ती आहेत; म्हणून हिंदूंनी त्यांच्यावर अन्याय केला’, असा कांगावा अजूनही चालू आहे. 
११. ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ पक्षाच्या वृंदा करात 
यांनी कांगावा करून रडून नक्षलवादाला समर्थन असल्याचे 
दाखवून देणे, निकालाचे अवलोकन केल्यास हिंदु असुरक्षित असल्याचे लक्षात 
येणे आणि ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु बांधवांनी एकत्रित लढा देणे आवश्यक असणे 
     ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ पक्षाच्या वृंदा करात या आरोपींना भेटल्या आणि ‘आरोपींना अटक का केली आहे ? हेसुद्धा ठाऊक नाही’, असा कांगावा करून अक्षरशः रडल्या आणि त्यांच्या या कृतीतून ‘त्यांचे नक्षलवादाला समर्थन आहे’, हेच त्यांनी दाखवून दिले. सदर लेखातील सर्व मजकूर हा सत्र न्यायालयाच्या निर्णयातील सारांश आहे. प्रत्यक्षात न्यायालयात किती पुरावे आले आणि किती पुरावे नष्ट केले असतील, ते देवालाच ठाऊक; परंतु या निकालाचे अवलोकन केल्यास सर्व सामान्य हिंदू किती असुरक्षित आहे, हे लक्षात येते. आज ही स्थिती पालटण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी एकत्रित लढा देणे आवश्यक आहे.’
- अधिवक्ता नागेश ताकभाते, हिंदु विधीज्ञ परिषद, सह-सचिव, गोवा राज्य.
     मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंपेक्षा संख्येने खूप कमी असूनही ते त्यांच्या धर्मश्रद्धांचा प्रश्‍न उपस्थित झाला की, हिंदूंच्या कित्येक पट जास्त संख्येने आंदोलने करतात ! म्हणून त्यांच्या धर्मश्रद्धा जपण्यासाठी राज्यकर्ते सतर्क असतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना समजलेले संघटित शक्तीचे महत्त्व हिंदूंना केव्हा समजणार ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn