Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जयललिता यांच्यावर दुसर्‍यांदा अंत्यसंस्कार करतांना बाहुलीवर अग्नीसंस्कार !

     म्हैसुरू/चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवावर द्रविडी परंपरेने अंंत्यसंंस्कार (दफनविधी) करण्यात आले होते. यावर जयललिता यांंच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जयललिता यांंना मोक्ष मिळावा, यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी पुन्हा एकदा हिंदु परंपरेप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. श्रीरंगपटना येथे कावेरी नदीच्या काठावर १३ डिसेंबरला हा विधी करण्यात आला. जयललिता यांच्या पार्थिवाऐवजी चितेवर एक बाहुली ठेवण्यात आली होती. जयललिता यांचा सावत्र भाऊ वरदराजू याने चितेला अग्नी दिला.
     जयललिता यांचा सावत्र भाऊ एन्.जे. वासुदेवन् यांनी सांगितले की, आम्ही अय्यंगार ब्राह्मण आहोत. मोक्ष मिळण्यासाठी जयललिता यांच्यावर श्री रामानुजाचार्य श्रीवैष्णव परंपरेने पुन्हा अंत्यसंस्कार केले. जयललिता यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी त्यांच्यावर हिंदु परंपरेने अंत्यसंस्कार करणे आवश्यक होते, असे पुरोहित रघुनाथ अय्यंगार यांनी सांगितले. पुढील ४-५ दिवस काही विधी करावे लागणार आहेत, असे अय्यंगार यांनी सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn