Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी सांगितलेला नामजप करतांना मानसभावाने आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु 
डॉ. जयंत आठवले
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
१. नामजप करतांना मानसभावानेे आश्रमात 
गेल्यावर प.पू. डॉक्टरांच्या खोलीकडे जातांना 
त्यांच्या खोलीतून प्रकाश दिसून तो खोलीत 
जाण्यास प्रतिबंध करत असल्याचे दिसणे,
प्रकाशाला  साष्टांग नमस्कार घातल्यावर प्रकाशाचे 
रूपांतर प.पू. डॉक्टरांमध्ये होऊन त्यांनी आशीर्वाद देणे 
     ‘अमृत महोत्सवाच्या दिवशी महर्षींनी सांगितल्यामुळे ‘श्री श्रीजयंत बाळाजी आठवले... जय गुरुदेव ।’, असा जप करायचा होता. त्या वेळी माझी मासिक पाळी चालू होती. जपाला आरंभ करताच मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र झाले. मी मनाने गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात गेले. आश्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेर गुरुदेवांची गाडी उभी होती. मी तिला प्रदक्षिणा घातल्या. नंतर मी आश्रमात प्रवेश केला. जिना चढून वर जात असतांना जिन्याच्या पायर्‍यांवर दोन्ही बाजूंनी ॐ उमटले होतेे. मी गुरुदेवांच्या खोलीच्या दिशेने जाणार्‍या मार्गाने गेले. मी गुरुदेवांच्या खोलीजवळ गेल्यावर खोलीतून ज्योतीप्रमाणे लख्ख पांढरा प्रकाश आला. मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रकाश मला पुढे जाऊ देत नव्हता. माझा आणि त्या प्रकाशाचा संघर्ष होत होता. मी पुढे गेले, तरी त्या प्रकाशामुळे माझे डोळे उघडत नव्हते. तेव्हा मी विचार केला की, मी मागच्या बाजूने खोलीत जावे. 

     मी मागच्या बाजूने जात असतांना तेथेही लख्ख प्रकाश मला पुढे जाऊ देत नव्हता. ‘ही प्रकाशमय ज्योत कुणाची आहे ? ती मला आत का जाऊ देत नाही ?’, असा विचार करून मी त्या प्रकाशाला साष्टांग नमस्कार केला. त्या वेळी ‘माझी मासिक पाळी चालू असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही’, असा विचार आला. तेव्हा त्या प्रकाशाचे रूपांतर साक्षात् प.पू. गुरुदेवांमध्ये झाले. ते मला लांबून हात दाखवून आशीर्वाद देत असल्याचे दिसले. 
२. आश्रमाभोवती प्रकाशाचे संरक्षणकवच निर्माण झालेले दिसणे, 
मंद वार्‍याचा स्पर्श जाणवणे आणि जप पूर्ण झाल्यावर हलके वाटणे 
     त्यानंतर तेथून बाहेर येऊन मी आश्रमाकडे पाहिल्यावर संपूर्ण आश्रमाभोवती लख्ख प्रकाश दिसला. त्या प्रकाशाचे आश्रमाभोवती जणू संरक्षककवच निर्माण झाले होते. माझा जप चालूच होता. माझे डोळे उघडत नव्हते. मंद अशा वार्‍याचा स्पर्श जाणवत होता. जप पूर्ण झाल्यावर मला पुष्कळ हलके आणि प्रसन्न वाटले.’ - सौ. भक्ती दीपक चौधरी, जळगाव (१५.७.२०१६)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn