Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवद आश्रमातील नंदू मुळ्ये यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

        २३.१२.२०१६ या दिवशी सकाळी श्री. नंदू मुळ्येकाका यांचे निधन झाल्याचे कळाले. मुळ्येकाकांनी गेल्याच आठवड्यात मला खाऊ पाठवला होता. पुष्कळ दिवस त्यांच्याशी बोलणेही झाले नसल्याने त्यांना भ्रमणभाष करून त्यांच्याशी बोलूया, असे ठरवले होते. काही ना काही कारणामुळे माझे बोलणे राहून जायचे. नेहमी इतरांच्या साहाय्यासाठी तत्पर असलेले आणि घरातील वडीलधार्‍या व्यक्तीप्रमाणे साधकांची काळजी घेणारे मुळ्येकाका आता नाहीत, हे कळल्यावर वाईट वाटले.
१. सूक्ष्मातून मुळ्येकाकांना पाहिल्यावर ते नेहमीप्रमाणे स्थिर असल्याचे दिसले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्याभोवती सूक्ष्मातून कवच करून वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षण केल्याचे दिसले.
३. २२.१२.२०१६ या दिवशी वातावरणात अतिशय दाब जाणवत होता. काकांच्या मृत्यूची घटना ऐकली, त्या वेळी वातावरणात जाणवत असलेला दाब उणावल्याचे लक्षात आले.
४. काकांचा आध्यात्मिक स्तर चांगला झाला असल्याचे आणि त्यामुळे त्यांनी स्थिर राहून मृत्यूला स्वीकारल्याचे जाणवले.
५. या घटनेनंतर इतकी वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले सांगत असलेला आपत्काळ आता चालूच झाला आहे, असे वाटले.
        काळाची गती ओळखून त्याप्रमाणे साधना करवून घेणार्‍या आणि मृत्यूनंतरही साधकांची काळजी घेणार्‍या परात्पर गुरूंचा आम्हा साधकांना सहवास मिळाला आहे, त्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
- सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn