Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय !

१. आश्रमात प्रत्येक ठिकाणी दैवी अनुभूती येऊन सात्त्विकता जाणवली ! 
 ‘आश्रमातील प्रत्येक ठिकाणाचे निरीक्षण केल्यानंतर आलेले अनुभव अत्यंत विलक्षण होते. प्रत्येक ठिकाणी दैवी अनुभूती येत असून प्रत्येक ठिकाणी सात्त्विकता जाणवत होती.’ - श्री. मोतीराम अनंता गोंधळी, अध्यक्ष, ‘हिंदु राष्ट्र जनजागरण समिती’, ठाणे, महाराष्ट्र. (२४.६.२०१६)
२. देवाच्या घरी आलो असून देवाचे दर्शन घडले, असे वाटले 
‘आश्रम पाहून प्रसन्नता वाटली. ‘मी देवाच्या घरी आलो आहे’, असे वाटून ‘मला देवाचे दर्शन घडले’, असे वाटले.’ - श्री. तुषार जयसिंग राजपूत, अध्यक्ष, शनिनगर मंडल, धुळे, महाराष्ट्र.(२४.६.२०१६) 
३. येथील साधकांची पूर्वपुण्याई किती असेल, याची प्रचीती आली
 आणि येथे सर्व शक्तीमान ईश्‍वराचाच वास आहे, हे मनाला पूर्णतः पटले ! 
‘आश्रमात आल्यावर भावजागृती झाली. ज्याप्रमाणे एखादी सासुरवाशीण आपल्या आई-वडिलांकडे माहेरी आल्यावर तिला आनंद जाणवतो, तसाच आनंद मला आश्रमात गुरुमाऊलीच्या आश्रमात आल्यावर जाणवला. माझा कंठ दाटून आला. ‘येथे रहाणार्‍या, सेवा करणार्‍या साधकांची पूर्वपुण्याई किती असेल’, याची प्रचीती आली. येथे सर्व शक्तीमान ईश्‍वराचाच वास आहे, हे मनाला पूर्णतः पटले.’ - श्री. गणेश पा. पाटील, भांडूप, मुंबई. (२४.६.२०१६) 
४. ‘सनातन धर्मा’ची व्याख्या इथे आल्यावर समजते ! 
‘सनातन आश्रम (श्रीकृष्णलोक) हेच माझे माहेर ! लग्न झालेल्या कन्येचे सासर कितीही श्रीमंत आणि सुखी असले तरी, त्या कन्येला आपले गरीब असलेले माहेर पुष्कळ प्रिय असते. तेथे तिला आई-वडील आणि अन्य सर्व नात्यांचे प्रेम मिळते. तसेच मला इथे वाटले. इथे आल्यावर ईश्‍वराचे, म्हणजेच साधक-साधिका यांचे प्रेम, नम्रता, आदर, श्रद्धा पाहून मला आनंद जाणवला. ‘सनातन धर्मा’ची व्याख्या इथे आल्यावर समजते. धन्य तो सनातन धर्म ! प.पू. डॉक्टरांना माझे नमन !’ - श्री. सचिन शांताराम घाग, भांडूप, मुंबई. (२४.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn