Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन बंद पडल्याने १२५ मुसलमान विद्यार्थ्यांची हानी !

देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्याविषयी आमदार अबू आझमी यांना पुळका !
     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना अबू आझमी यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेवर कारवाई केल्याने १२५ मुसलमान विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाल्याचे सूत्र उपस्थित केले; मात्र डॉ. नाईक यांच्या संस्थेवर केंद्र शासनाने केलेली कारवाई योग्यच आहे, असे सूत्र भाजपच्या काही आमदारांनी मांडून अबू आझमी यांचे सूत्र खोडून काढले.
     अबू आझमी म्हणाले, डॉ. झाकीर नाईक यांनी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांत खुल्या मैदानात भाषणे दिली आहेत. केंद्र शासनाने त्यांच्या संस्थेवर बंदीची कारवाई केल्यामुळे त्या संस्थेत शिक्षण घेणार्‍या १२५ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. (उलट डॉ. झाकीर यांच्या संस्थेतून काढल्यामुळे या मुसलमान विद्यार्थ्याचे भवितव्य सुरक्षित झाले आहे, हे कुणी कशाला सांगायला हवे ? डॉ. झाकीर यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन आतंकवादी झाल्याचे मुसलमान तरुणांनी सांगितल्याचे आझमी का विसरतात ? - संपादक) 
     औचित्याच्या सूत्रात अबू आझमी यांनी मांडलेली बरीचशी सूत्रे नव्हती. त्यांनी औचित्याच्या सूत्रात वेगळीच माहिती दिली होती. हे विधानसभेच्या तालिका अध्यक्षांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आझमी यांना याची जाणीव करून दिली. काही आमदारांनी अबू आझमी औचित्याच्या सूत्रावर चुकीची माहिती देत आहेत, असे सभागृहात सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn