Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बँक खात्यामध्ये ५ सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरण्यावरील निर्बंध मागे !

नोटाबंदीनंतर नवनवीन नियम करून आणि
ते मागे घेऊन जागतिक विक्रम करू पहाणारे केंद्र सरकार !
     नवी देहली - बँकेत पैसे जमा करण्यावर यापूर्वी घोषित करण्यात आलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने मागे घेतले आहेत. १७ डिसेंबरला सरकारने राजपत्रित सूचना जारी करून जुन्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा असलेल्या ५ सहस्र रुपयांंपेक्षा अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार, असा आदेश दिला होता. तसेच ही रक्कम यापूर्वी का भरता येऊ शकली नाही, याचे स्पष्टीकरणही खातेधारकांकडून मागवले होते. या आदेशावर मोठ्या प्रमाणावर टीका चालू झाल्यावर रिझर्व्ह बँकेने २१ डिसेंबरला नवी सूचना जारी करून हे दोन्ही आदेश मागे घेतले आहेत. त्यामुळे आता केवायसी(know your customer) (म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आदी पुरावे देऊन स्वतःची ओळख बँकेला पटवून देणे) कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ग्राहकांना बँक खात्यात ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात ५ सहस्र रुपयांंपेक्षा अधिक रक्कम जमा करता येईल. तसेच ही रक्कम जमा करतांना त्यांना बँक अधिकार्‍यांना कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागणार नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn