Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चेन्नईमध्ये ‘वरदा’ चक्रीवादळात २ ठार !

    चेन्नई - ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने ‘वरदा’ चक्रीवादळ चेन्नईच्या किनार्‍यावर धडकले आहे. सोसाट्याच्या वार्‍याने किनारपट्टीवरील अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. १२ डिसेंबरला दुपारपर्यंत चक्रीवादळात २ जण ठार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. चेन्नईत ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. ७ सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून चेन्नई विमानतळावरील वाहतूक थांबवण्यात आली. त्याचप्रमाणे चक्रीवादळाचा कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी येथील अणूऊर्जा प्रकल्पात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. मच्छीमारांनाही चेतावणी देण्यात आली आहे. साहाय्यतेसाठी सैन्याच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
१. चेन्नई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ११ डिसेंबरच्या रात्रीपासून पाऊस पडत होता. चेन्नईतील स्थानिकांना घरीच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आवश्यकता असेल, तरच लोकांनी घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.
२. १२ डिसेंबरला चेन्नई, कांचीपुरम् आणि तिरुवलून यांसह किनारी भागातील सर्व शाळा-महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली होती, तसेच अण्णा विश्‍वविद्यालयाने १२ डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.
३. बंगालच्या खाडीतून उठलेले ‘वरदा’ या हंगामातील तिसरे चक्रीवादळ आहे. ‘वरदा’चा अर्थ अरबी किंवा उर्दूमध्ये ‘गुलाब’ असा होतो. उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांना हवामान खात्याकडून नावे दिली जातात.
साधकांना आश्‍वस्त करणारे महर्षींचे आशीर्वचन !
‘कार्तिक दीपम्’मुळे तमिळनाडूतील चक्रीवादळापासून साधकांचे रक्षण होईल !
     ‘१२.१२.२०१६ या दिवशी तमिळनाडूत विनाशकारी चक्रीवादळ आले आहे, त्याच वेळी तमिळनाडूत प्रतिवर्षाप्रमाणे ‘कार्तिक दीपम्’ हा धार्मिक विधीही होत आहे. ‘चक्रीवादळामुळे मानवी हानी होणार असली, तरी ‘कार्तिक दीपम्’मुळे साधकांचे रक्षण होणार आहे’, असे आशीर्वचन देऊन महर्षींनी साधकांना आश्‍वस्त केले आहे. पुढील आपत्काळातही साधकांचे रक्षण होणार असल्याचे महर्षींनी यापूर्वीच सांगितले आहे. साधकांचे सदैव रक्षण करणार्‍या महर्षींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn