Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु संस्कृतीचा विसर ?

सनबर्न संगीत फेस्टिव्हल, हा सध्या चर्चेचा विषय आहे. पुणे शहरात त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले असून संस्कृतीनिष्ठ हिंदु संघटना त्याला प्रखर विरोध करत आहेत. हिंदु संस्कृतीच्या वातावरणात हा कार्यक्रम होणे अशोभनीय आहे. हा कार्यक्रम म्हणजे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अतीक्रमण, असेच समीकरण आहे. महाराष्ट्र राज्यात संस्कृतीप्रेमी आणि धर्मप्रेमी राजवट आहे. तरीही हा कार्यक्रम तेथे होऊ पहात आहे. गोवा राज्यातील जनतेने त्याला विरोध केल्यामुळे या राज्यातून त्याला पळ काढावा लागला. पंतप्रधानांचे विकासाचे सूत्र आपण जेव्हा पहातो, तेव्हा संस्कृतीप्रेम हा घटक डोळ्यांसमोर येतो. जनतेचा सर्वांगीण विकास म्हणजे देशाचा विकास आणि जनतेचा विकास तिच्या भावनांशी जोडला गेला आहे. असे असतांना देखिल जनतेला शासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळणे, हा दैवदुर्विलास आहे. राज्याचे पर्यटन राज्यमंत्री म्हणतात, ‘‘सनबर्न संगीत फेस्टिव्हलमुळे पर्यटनाला चालना मिळून सरकारचा महसूल वाढेल. काळाप्रमाणे लोकांच्या विचारसरणीत आणि सांस्कृतिक विचारांमध्ये पालट होत आहेत. पुण्यातील तरुणाईची आवड लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’’ आमदार माधुरी मिसाळ म्हणतात, ‘‘महिलांनी कसे कपडे घालायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. हिंदुत्वनिष्ठांनी काही संस्कृतीचा ठेका घेतलेला नाही.’’ काय म्हणायचे या विचारधारेला ? संस्कृतीच्या विरोधात जाऊ नका, असा हिंदुत्वनिष्ठ आग्रह धरतात, तेव्हा त्यांना अपमानित करणारे वक्तव्य करायचे, ही गोष्ट राज्यकर्त्या पक्षाच्या प्रतिनिधींना अशोभनीय आहे. राज्यातील जनतेसमोर काय बोलायचे याचे भान नसलेली ही मंडळी राज्य करण्याच्या तोर्‍यात आहे. तुम्हाला जनतेने का निवडून दिले आहे ? तुमच्याकडून तिच्या काही अपेक्षा आहेत. हिंदु धर्मियांना त्यांच्या रुढी-परंपरा आणि संस्कृती यांची जोपासना करायची आहे. त्यांना ते करण्यासाठी वाव हवा आहे. इतकी वर्षे झालेली घुसमट त्यांना थांबवायची आहे. जनता जेव्हा आशेने तुमच्याकडे पहाते, तेव्हा त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला गेला पाहिजे. स्वतः तुमच्या लक्षात काही गोष्टी येत नाहीत. समाजातील कुणीतरी ते लक्षात आणून देत आहे. असे असतांनाही उलट त्यांनाच दमदाटी करून त्यांचा आवाज बंद करायचा. लोकराज्याची ही विटंबना आहे. अर्थात् विषय येथे संपत नाही, तर तो येथे चालू होत आहे. हिंदुत्वनिष्ठ ‘सनबर्न संगीत फेस्टिव्हल’ या हिंदुद्वेषी कार्यक्रमाला विरोध करणारच आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn