Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीमुळे महिलांची तस्करी सध्या बंद !

  • नोटाबंदीमुळे अनेक अपव्यवहारांना फटका बसल्याचे दिसत 
    असतांना या नोटाबंदीला विरोध करणारे कुणाची पाठराखण करत आहेत ?
  • महिलांच्या तस्करीचा व्यवसाय २० लाख कोटी रुपयांच्या घरात !
   नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. याचा मोठा परिणाम महिलांची तस्करी करण्याच्या घटनांवरही झाला आहे. महिलांच्या तस्करीचा व्यवसाय २० लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. हा सगळा व्यवसाय काळ्या पैशावर चालतो. त्यामुळे या उद्योगाला नोटाबंदीचा फटका बसला असून महिलांची तस्करी सध्या बंद झाली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. 
१. मुख्यत: गौहत्ती, झारखंड, चेन्नई, बेंगळुरू आणि भाग्यनगर (हैद्राबाद) येथून महिलांची तस्करी केली जाते; परंतु मागील एक महिन्यापासून एकाही मुलीची किंवा महिलेची तस्करी झालेली नाही. यात सर्व व्यवहार हे रोखीने होत असतात. दलालांच्या हातात ठेवण्यासाठी रोख रक्कम नसल्याने हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. जो पैसा जवळ आहे त्याला रद्दीची किंमत आहे, असे बचपन बचाओ आंदोलन संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते राकेश सेनगेर यांनी सांगितले आहे. 
२. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी सांगितले की, तस्करी हे भारतातील गुन्हेगारीचे सर्वात मोठे जाळे आहे. एका मुलीच्या किंवा महिलेच्या तस्करीसाठी किमान अडीच लाख रुपये घेतले जातात. १० ते १२ वयोगटातील मुलींसाठी ५ लाख रुपये दर आहे, तर १३ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ४ लाख रुपये किंमत असते.
३. महिलांना वेश्याव्यवसाय, प्लेसमेंट एजन्सीमध्ये पाठवले जाते. यात अल्पवयीन मुलींचाही समावेश असतो. 
४. या व्यवहारात सर्व काळा पैसा असतो. कुंटणखान्याचे मालक किंवा मुलींना विकत घेणारे त्यांचे पैसे अधिकोषात टाकू शकत नाहीत. नवीन चलन उपलब्ध होत नसल्याने कोणी मुली विकण्यासही सिद्ध होत नाहीत.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn