Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
४. ब्राह्मतेजाचे महत्त्व
अ. ‘ब्राह्मतेजात क्षात्रतेज असतेच; म्हणूनच ऋषी राजाला शाप देऊ शकत.’ (९.५.२०१२)
आ. ‘संतांमध्ये ब्राह्मतेज असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला लाखो लोक स्वेच्छेने आणि श्रद्धेने येतात. राजकीय सभांप्रमाणे त्यांना पैसे देऊन किंवा वाहनसुविधा देऊन बोलवावे लागत नाही.
इ. एकाही राजकीय पक्षाचा विदेशात प्रचार होत नाही; पण आध्यात्मिक संस्थांचा होतो; कारण आध्यात्मिक संस्थांकडे धर्माचे व्यापकत्व आणि आध्यात्मिक तेज, म्हणजेच ब्राह्मतेज असते.’ (२३.४.२०१२)
५. क्षात्रतेजासह ब्राह्मतेज असण्याचे महत्त्व सांगणारी उदाहरणे
५ अ. भगवान परशुराम : ‘यांचे वर्णन असे केले आहे -
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥
अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे आणि पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास परशुराम शाप देऊन वा बाणाने हरवील.
     परशुरामाने ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावर २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. याचा उल्लेख वाल्मीकिऋषींनी ‘राजविमर्दन’ असा केला आहे. त्याचा अर्थ आहे, ‘दुर्जन राज्यकर्त्यांचा नाश.’ येथे लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे सूत्र म्हणजे भगवान परशुरामाने केवळ शस्त्राने नाही, तर शाप देऊन, म्हणजे ब्राह्मतेजाचा वापर करून दुर्जन राज्यकर्त्यांचा नाश केला.
५ आ. छत्रपती शिवाजी महाराज : हे कुलदेवी श्री भवानीदेवीचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मुखात नेहमी ‘जगदंब... जगदंब’ असा नामजप असे. त्यांचे मावळे लढतांना ‘हर हर महादेव’चा जयघोष करत असत. त्यामुळे मनुष्यबळ आणि साधनसामुग्री अल्प असूनही ते पाच बलाढ्य पातशाह्यांना नमवून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करू शकले. त्यांच्या साधनेमुळेच त्यांना संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचे आशीर्वाद मिळाले अन् मोठमोठ्या संकटांतून त्यांचे रक्षण झाले. देवतांची भक्ती केल्याने दैवी शक्तीचे साहाय्य मिळते आणि आपण अंगीकारलेल्या कार्यात यश मिळते, याचे हे उदाहरण आहे.’ (२३.४.२०१२)
६. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी
आवश्यक असलेले ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे बळ !
       ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज मिळावे, या उद्देशाने समष्टी कार्य करणारे १०० संत, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत ५ लक्ष समाजसेवी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची आवश्यकता आहे. येत्या ४ वर्षांत सनातन संस्थेचे १०० साधक संत होतील. त्यामुळे वातावरणातील रज-तमाचे प्रमाण घटणे, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या भोवती संरक्षणकवच निर्माण होऊन त्यांना बळ मिळणे, या गोष्टी साध्य होतील. (टीप १) त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य होईल.’ (९.४.२०१३)
(टीप १ - काळोखात दिव्याचा प्रकाश उपयोगी होतो; मात्र दाट धुक्याच्या आवरणात दिव्याचा प्रकाशही निष्प्रभ ठरतो. त्याचप्रमाणे सध्याच्या रज-तमात्मक गुणांच्या आवरणात स्वतःच्या साधनेची क्षमता कार्यासाठी पुरेशी वापरता येत नाही. संतांच्या प्रभावाने हे आवरण घटल्यास हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या कार्यक्षमतेचा वापर अधिक चांगला होऊ शकेल.)
(क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)
     ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ हा ग्रंथ ऑनलाइन खरेदी करण्यासाठी ‘सनातन शॉप’च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn