Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकच्या अधिकार्‍याची मुजोरी !

संपादकीय
      पाकची मुजोरी केवळ सीमेवरच आहे असे नाही, तर ती सर्वच ठिकाणी दिसून येते. पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘हार्ट ऑफ एशिया’ या परिषदेच्या निमित्ताने पाकचे परराष्ट्र विषयक सल्लागार सरताज अझीज यांच्या वर्तनातून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अझीज यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिल्यानंतर तेथेच परस्पर पत्रकार परिषद घ्यायचा घाट घातला होता. पत्रकार परिषदेत त्यांनी पाकच्या विखारी विचारांचीच री ओढली असती, यात शंका नाही. भारताने तो घाट उधळून लावला. त्यामुळे अझीज यांना हात हलवत परतावे लागले. खरे तर या घटनेचे गांभीर्य खूप आहे. शत्रूराष्ट्राचा एक अधिकारी आपल्या देशात येऊन परस्पर पत्रकार परिषद घ्यायचा प्रयत्न करतो, यावरून पाकचे भारतावर शक्य तेथे आणि शक्य त्या मार्गाने कुरघोडी करण्याचे धोरण स्पष्ट होते. असे धाडस एका तरी भारतीय अधिकार्‍याने पाकमध्ये जाऊन कधी दाखवले आहे का ? राजनैतिक शिष्टाचार बाजूला ठेऊन अशी कृती करणार्‍या एका फडतूस अधिकार्‍याला सरकारने खरेतर तेथेच खडसवायला हवे होते. अझीज यांच्या या कृतीवर त्यांच्यावर सर्व थरातून टीका झाली. म्हणूनच पाकचे मनसुबे ओळखून सरकारने आता तरी पाकच्या एकाही व्यक्तीला भारतात पाय ठेऊ न देण्याचे धोरण अवलंबावे. तेच पाकला सडेतोड उत्तर ठरेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn