Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संस्कृतीविरोधी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करण्यासाठी पुणे येथील धर्माभिमानी एकवटले !

श्री. पराग गोखले
     केसनंद (जि. पुणे) येथे भारतीय संस्कृतीविरोधी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी केसनंद-वाघोली पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या भेटी घेत असतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. ग्रामस्थांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करू नये,
यासाठी धूर्त आयोजकांनी ग्रामस्थांना प्रलोभने दाखवणे !
     ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांना जागृत करणे, जागृतीपर बैठकांचे आयोजन करणे अशा सेवा करण्यास आरंभ झाला. त्या वेळी ‘सनबर्न’च्या आयोजकांकडून अथवा त्यांच्या वरिष्ठ पातळीवरून ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांना प्रलोभने दाखवली गेली. स्थानिक स्तरावर विरोध होऊ नये, यासाठी गावातील मंदिरांना कोट्यवधी रुपयांची देणगी देण्याचे आश्‍वासन देणे, गावात डांबरी रस्ता बांधून देणे अथवा अन्य सोयीसुविधा निर्माण करण्याचे आश्‍वासन देणे, या माध्यमातून प्रयत्न केले जात होते.
२. ‘सनबर्न’च्या आवारात मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक असल्याने संशय बळावणे !
     त्या ठिकाणी सुरक्षारक्षक, तसेच ‘बाऊन्सर्स’ही मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी कुणालाही अगदी गावकर्‍यांनाही सहजासहजी त्या ठिकाणी प्रवेश नाही. या गावात भजन वा कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या वेळी कधी ‘बाऊन्सर्स’ ठेवण्याची वेळ येत नाही. येथे मात्र ज्या अर्थी एवढी लपवालपवी केली जात आहे, त्या अर्थी त्या ठिकाणी निश्‍चितपणे काहीतरी काळेबेरे आहे.
३. ‘सनबर्न’मुळे युवा पिढी व्यसनाधीन होण्याच्या धोक्यामुळे
ग्रामस्थांनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने विरोध करायचे ठरवणे !
     सनबर्नवाल्यांनी प्रलोभने दाखवून गावाचा विकास करण्याचे आश्‍वासन दिले, तरी जर घरातील तरूण पिढीच सनबर्नसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यसनाधीन झाली, तर त्यामुळे होणारे दुःख किती मोठे असेल ? याविषयी ग्रामस्थांमध्ये जागृती केल्यावर सर्व ग्रामस्थांनी संघटित होऊन सनबर्नला सनदशीर मार्गाने विरोध करण्याचे ठरवले.
४. भारतियत्वाचा लवलेश नसलेले कार्यक्रम भारतामध्ये का ?
     ‘सनबर्न’मध्ये भारतियत्वाचा लवलेशही नाही. या कार्यक्रमामधील संगीत विदेशी, वाजवली जाणारी वाद्ये विदेशी, आचार-विचार विदेशी आणि पोशाखही विदेशी ! मग भारतियत्वाचा लवलेशही नसणार्‍या या कार्यक्रमाचे आयोजन भारतात का ?
५. पुरोगामित्वाच्या नावाखाली चालणारा असंस्कृतपणा संस्कृतीप्रेमींना अमान्य !
     याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना काही संस्कृतप्रेमी मंडळींनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले, ‘‘अशा कार्यक्रमांमुळे व्यसनाधीनता बोकाळून तरूण पिढी उद्ध्वस्त होत असेल, तर ते कोणालाही अमान्य असेल. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे पुढारलेपणा अथवा पुरोगामीपणा आहे, असे भलेही कुणी सांगत असेल, तरी पुरोगामित्वाच्या नावाखाली चालणारा असंस्कृतपणा आम्हा संस्कृतीप्रेमींना मान्य नाही. भोंदू पुरोगामीपणाला विरोध करून संस्कृती आणि धर्म विरोधी कार्यक्रमाला सनदशीर मार्गाने विरोध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’ - श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती, पुणे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn