Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विविध संघटनेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग !

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती 
सभेला विविध प्रभागांतील हिंदुत्ववाद्यांचा 
मशाल फेरीने सभास्थळी येण्याचा मानस ! 

     जळगाव, १३ डिसेंबर (वार्ता.) - जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने शहरातील विविध प्रभागांत, भागवत सप्ताहाच्या ठिकाणी, विविध समाजाच्या बैठकांच्या ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभेचा उद्देश सांगून निमंत्रण देण्यात येत आहे. शहरातील विविध प्रभागांतील हिंदुत्वनिष्ठ सभास्थळी ढोल-ताशांच्या गजरात, हातात भगवे ध्वज घेऊन, मशाल फेरीद्वारे पोचण्याचे नियोजन करत आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसोबतच शहरातील गणेशोत्सव मंडळांचे सदस्य, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात सुमारे १ लक्ष हिंदूंपर्यंत धर्मजागृती सभेचा विषय पोचला आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांनी सांगितले आहे.

सभेची भित्तीपत्रके रिक्शावर लावतांना धर्माभिमानी
     शहर आणि ग्रामीण भागात हिंदुत्वनिष्ठ हिंदूच पुढाकार घेऊन बैठकांचे आयोजन करत आहेत. आतापर्यंत शहरात ३०, तर ग्रामीण भागात ३५ बैठका झाल्या असून सभेपर्यंत २०० हून अधिक बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकांना शहरात सरासरी ४०, तर ग्रामीण भागात सरासरी ७० जणांची उपस्थिती असते. बैठकीला उपस्थित असलेले धर्माभिमानीच त्यांच्या प्रभागात प्रसार करण्याचे दायित्व घेत आहेत. धर्माभिमान्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सध्या शहरातील प्रत्येक चौकात केवळ हिंदु धर्मजागृती सभेचीच चर्चा होत असल्याचे चित्र आहे. रिक्शांना, तसेच भितींना पोस्टर लावणे, एस्.टी. बसमध्ये पोस्टर लावणे, होर्डिंग लावणे, पत्रकांचे वाटप, फलक लिखाण, भगवे ध्वज लावणे, सभेचे स्टीकर्स गाड्यांवर लावणे आदी विविध माध्यमांतून धर्माभिमानी सभेच्या प्रचारकार्यात सहभागी होत आहेत. 
 शहरात घरोघरी प्रसाराला चांगला प्रतिसाद ! 
     शहरातील नवीन प्रभागातही या वेळी प्रसाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये धर्मजागृती सभेविषयी उत्सुकता वाटत आहे. १५ साधक प्रतिदिन २० कि.मी.चा परीसरात प्रसार करीत असून आतापर्यंत शहरातील ५० प्रतिशत भागात सभेचा प्रत्यक्ष विषय पोचला आहे. या फेरीत मेगाफोनद्वारे हिंदु धर्मजागृती सभेला येण्यासाठी आवाहन करण्यात येते, सोबतच हस्तपत्रके वितरण, धर्मजागृती सभेची विशेष स्मरणिका, सनातननिर्मित ग्रंथ, सात्त्विक उत्पादने यानांही चांगली मागणी मिळत आहे. 
 सामाजिक संकेतस्थळावरून प्रसाराला गती ! 
     व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबूक यामुळे लक्षावधी धर्माभिमानी हिंदूंपर्यंत धर्मजागृती सभेचा विषय सुलभरीत्या पोचत आहे. व्हॉट्सॅपद्वारे आतापर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील ५७० गट जोडले गेले असून प्रतिदिन सुमारे ३८ सहस्र ५०० धर्माभिमान्यांपर्यंत प्रत्यक्ष सभेचा विषय पोचत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभेच्या फेसबूक पेजवर जळगाव धर्मसभेची अपलोड केलेली ध्वनीचित्रफीत केवळ २ दिवसांत ८ सहस्र ५०० लोकांनी पाहिली, तर १०२ लोकांनी शेअर केली. फेसबूकद्वारे प्रतिदिन ४० सहस्रांहून अधिक हिंदूंपर्यंत सभेचा विषय प्रत्यक्ष पोचत आहे. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn