Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बालवयातच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा जयपूर, राजस्थान येथील कु. देव नोगिया (वय ८ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे
हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !
या पिढीतील कु. देव नोगिया एक दैवी बालक आहे !
१. कु. देवच्या जन्मापूर्वीपासून त्याचे आई-वडील साधनारत असणे
  
कु. देव नोगिया
‘कु. देव नोगिया हे आमचे दुसरे पुत्ररत्न. याचा जन्म ३.५.२००८ या दिवशी झाला. आमच्या घरात मी आणि माझी आई (कु. देवची आजी) आम्ही दोघे जण वर्ष २००५ पासून साधना करतो. कु. देवच्या जन्मापूर्वीपासून त्याची आई सौ. सुनिता याही नामजप करतात.
२. देवच्या जन्माच्या संदर्भात त्याच्या आजीला मिळालेली पूर्वसूचना
   श्रीकृष्णाच्या मंदिरात बसलेली असतांना पाठीवर आणि नंतर मांडीवर एक बालक येऊन बसल्याचा भास होणे आणि नंतर सून गरोदर असल्याचे समजणे : देवच्या आगमनाची पूर्वसूचना त्याच्या आजीला पूर्वीच मिळाली होती. एकदा माझी आई श्रीकृष्णाच्या मंदिरात बसली होती. तेव्हा कुणीतरी लहान बालक तिच्या पाठीवर बसल्याचा तिला भास झाला. काही वेळाने ते लहान बालक तिच्या मांडीवर येऊन बसले. त्या वेळी तिला श्रीकृष्णाच्या बालक रूपातील अनुभूती आली. तिला आश्‍चर्य वाटले. आमच्या घरात हे लहान मूल कुठून येणार ?; कारण तिला वाटत होते, ‘आम्हा उभयतांना केवळ एकच मूल हवे आहे.’ त्या वेळी कामाच्या निमित्ताने मी जयपूरच्या बाहेर रहात होतो. माझी धर्मपत्नी सौ. सुनिताही माझ्यासमवेतच होती. घरी गेल्यावर तिने माझ्या आईला गर्भधारणेविषयी सांगितले. त्या वेळी आईला ईश्‍वराने दिलेली पूर्वसूचना सत्य झाल्याची प्रचीती आली. चि. देवच्या नामकरणासाठी आलेल्या ब्राह्मणाने हा बालक अतिशय भाग्यवान असल्याचे सांगितले.
३. पू. पिंगळेकाकांनी एका साधकाच्या आध्यात्मिक
पातळीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देवने अचूक देणे
    जयपूर येथील साधक श्री. राजकुमार भार्गव यांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्यापूर्वी पू. पिंगळेकाका (सनातनचे संत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे) यांनी साधकांना एकत्रित केले आणि सर्वांना श्री. राजकुमार भार्गव यांच्या आध्यात्मिक पातळीविषयी विचारले. त्या वेळी सर्वांना ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आहे’, असे वाटतच होते. सर्वांनी अचूक उत्तर दिले. पू. पिंगळेकाकांनी देवलाही (मुलालाही) हा प्रश्‍न विचारल्यावर त्याने त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के असल्याचे सांगितले. त्याच्याकडून असे उत्तर मिळाल्यावर पू. पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘तुम्ही याच्याकडे लक्ष ठेवा. त्याला मायेतील कोणतेही प्रश्‍न विचारू नका.’’
४. ज्ञानाची योग्य दिशा मिळाल्यास शंकराचार्य पदावर आरूढ होण्याची
क्षमता देवमध्ये असल्याचे एका ज्योतिषाने सांगणे
   पाक्षिक सनातन प्रभातच्या एका वर्गणीदाराचे सासरे सेवानिवृत्तीनंतर जन्म-कुंडली निःशुल्क पहातात. त्यांना मी माझ्या मोठ्या मुलाची पत्रिका दाखवली. त्यासमवेत देवचीही पत्रिका दाखवली. देवची पत्रिका पाहून त्यांनी आश्‍चर्य व्यक्त करत सांगितले, ‘‘याला ज्ञानाची योग्य दिशा मिळाली, तर शंकराचार्य पदावर आरूढ होण्याची याच्यात क्षमता आहे.’
५. कु. देवची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
अ. कु. देव त्याच्या वयाच्या मुलांसारखा चंचल नाही. तो कोणत्याही प्रकारची मस्ती करत नाही.
आ. ज्या कृत्यापासून इजा किंवा हानी होण्याची शक्यता असेल, असे कोणतेही जोखमीचे कृत्य तो करत नाही.
इ. घरात केल्या जाणार्‍या पूजा किंवा आरती यांसारख्या कृती देव अगदी लक्षपूर्वक पहातो आणि स्वतः तशाच कृती करण्याचा प्रयत्न करतो.
ई. पुष्कळ वेळा घरातील गोष्टींविषयी निर्णय घेतांना त्याचेही मत घेतले जाते आणि ते योग्य असते.
उ. तो आपल्यापेक्षा ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या भावाचे जुने कपडे आनंदाने वापरतो. कधीही नवीन कपडे किंवा महाग खेळणी यांसाठी हट्ट करत नाही. आपण त्याच्या वयाच्या मुलांकडून किंवा अन्य मुलांकडून अशी अपेक्षा करू शकत नाही.
ऊ. त्याला समजावल्यावर तो सर्वकाही ऐकतो.
ए. नामजप करायला सांगितल्यावर तो लगेच ऐकतो आणि करतो.’
- श्री. किरण कुमार नोगिया (कु. देवचे वडील), जयपूर, राजस्थान. (२८.३.२०१६)
पालकांनो, हे लक्षात घ्या !
    ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
    यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn