Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सौ. शोभा कौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जावई श्री. अजित तावडे यांनी लिहिलेले काव्य

सौ. शोभा कौलकर
व्यष्टीसह समष्टी साधना करून । 
जा तू गुरुचरणांसी सत्वर ॥
‘न ऋण जन्मदात्रीचे फिटे’ ।
सांगून गेले प्रभु श्रीराम ।
सनातनच्या या मातेचे ।
आम्हावर ऋण असे अमाप ॥ १ ॥

साधनेत स्वतःस झोकूनी देऊनी ।
पतीसह कन्येस साधनारत करूनी ।
पुत्रास अर्पिले राष्ट्र-धर्म कार्या ।
श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेवूनी ॥ २ ॥
तळमळीने करत असे सेवा ।
व्यष्टी साधनेचाही चाखे ‘मेवा’ ।
राष्ट्र-धर्माची स्थिती पालटण्या ।
करतसे अखंड प्रार्थना ॥ ३ ॥

ऐशा माते प्रणाम करिती । 
साधक सारे तिच्या जन्मदिनी ।
गुरुचरणांसी जावो सत्वर ।
हीच मनीषा मनी ठेवूनी ॥ ४ ॥

- श्री. अजित तावडे (सौ. शोभा कौलकर यांचे जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn