Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाश्‍चात्त्यांनो, भारतियांमध्ये हीनगंड पोसण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ‘वाळूच्या दोरीने आकाश बांधण्यासारखे व्यर्थ आहे’, हे लक्षात घ्या !

१. हिंदु धर्म आणि शास्त्र यांनी वैभव अन् संकटे यांच्या
काळातही भारताची समाजव्यवस्था सुसंघटित ठेवणे 
   ‘शक, हूण आणि यवन या इस्लामी सत्तांच्या आक्रमणामुळे भारतात सहस्रो (हजारो) वर्षे समाज अन् धर्म यांच्या अस्तित्वावर प्रचंड संकट कोसळले होते; पण आमचा समाज इतका शास्त्रीय आणि धर्मनिष्ठ होता की, त्या समाजावर राजसत्तेला नियंत्रण ठेवता आले नाही. तेव्हा आमची समाजव्यवस्था ही अविघटित, अच्छेद्य आणि अभंग राहिली.
वैभव आणि संकटे यांच्या काळातही भारताची समाजव्यवस्था सुसंघटित ठेवण्याची केवढी बहुमोल कामगिरी आमचा धर्म अन् शास्त्र यांनी केली आहे !
२. पाश्‍चात्त्यांनी बुद्धीभ्रंश केल्याने हिंदूंना स्वतःचा धर्म,
संस्कृती आणि समाजरचना हीन वाटू लागणे
   अठराव्या शतकात ‘गोरे पाय’ या पुण्यभूमीला लागले. गोर्‍या राज्यकर्त्यांनी आमची समाजव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी हेतूपूर्वक कसोशीचे प्रयत्न केले. सर्व बाजूंनी त्यांनी आमची समाजरचना मोडण्यासाठी आक्रमणे केली. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांत आमच्यामध्ये न्यूनगंड पसरवला. पाश्‍चात्त्यांनी आमचा इतका ‘ब्रेन वॉश’ केला की, त्यामुळे आमचा बुद्धीभ्रंश होऊन आमचा धर्म आणि समाजरचना संपूर्णपणे आज पाश्‍चात्त्य असल्याचे वाटू लागले अन् आमची संस्कृती हीन वाटू लागली.
३. शास्त्र आणि समाज परंपरा यांचे सहेतुक विपर्यस्त
विकृत विवरण करणार्‍यांच्या विरुद्ध प्राणपणाने झगडूया !
शास्त्र आणि समाज परंपरा यांचे सहेतुक विपर्यस्त विकृत विवरण अन् अर्थ यांविरुद्ध आम्ही प्राणपणाने झगडले पाहिजे. यांविरुद्ध दंड थोपटीत युद्ध (Ideological War) पुकारले पाहिजे. सत्प्रेरणेने आम्ही हे देवकायर्र् पार पाडूच पाडू !
या पाश्‍चात्त्यांना ठाऊक नाही की, आमच्यात हीनगंड पोसण्याचा यत्न करणे, म्हणजे वाळूच्या दोरीने आकाश बांधण्यासारखे व्यर्थ आहे.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn