Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमेरिकेतील विनोदी कार्यक्रमात नोटाबंदी आणि राष्ट्रगीत यांची खिल्ली !

अमेरिकी जनमानसामध्ये भारतद्वेष ठासून भरला 
असल्यामुळेच भारताच्या राष्ट्रहिताशी निगडित निर्णयांविषयी
तेथील दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात खिल्ली उडवली जाते ! 
     वॉशिंग्टन - अमेरिकेत १ डिसेंबर या दिवशी प्रसारित करण्यात आलेल्या ‘द डेली शो विथ ट्रिवोर नोआ’ या विनोदी कार्यक्रमात भारतातील नोटाबंदी आणि चित्रपटगृहांत चित्रपटाच्या प्रारंभी राष्ट्रगीत दाखवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाची खिल्ली उडवण्यात आली. 
     भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरवल्या. यावर विनोद करतांना कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ट्रिवोर नोआ याने ‘असे प्रथमच घडत आहे की, लोक दुसर्‍यांना पैसे देत आहेत; पण पैसे न घेता लोक ‘ते तुम्हालाच राहू द्या’, असे म्हणत आहेत’, असे सांगत नोटाबंदीची खिल्ली उडवली. यावेळी कायक्रमातील पडद्यावर देहलीच्या ‘एटीएम्’ समोर लोकांनी लावलेल्या रांगांची दृष्ये दाखवण्यात आली. 
  चित्रपटगृहात दाखवण्यात येणार्‍या राष्ट्रगीताची खिल्ली ! 
     भारतात सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच चित्रपटगृहात चित्रपटाला प्रारंभ होण्यापूर्वी राट्र्रगीत वाजवणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. याविषयी याविषयी कार्यक्रमात खिल्ली उडवण्यात आली. कार्यक्रमात ‘स्क्रीन’वर (पडद्यावर) ‘प्यार की एक रात’ नावाच्या अश्‍लील चित्रपटाचे पोस्टर दाखवण्यात आले. त्यावर अर्धनग्न अभिनेत्रीचे चित्र होते. ते दाखवून ‘या चित्रपटापूर्वीही भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात येईल’, असे नोआने म्हटले. (भारताने राष्ट्रहिताशी निगडित काही निर्णय घेतल्यावर अमेरिकेतील विनोदी अभिनेते त्याविषयी दूषणे का देतो ? भारताने अमेरिकेच्या विरोधात कठोर धोरणे अवलंबली, तरच हे थांबेल ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn