Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भारतीय प्रसारमाध्यमे राष्ट्रवाद आणि देशद्रोह यात फसलेली आहेत ! - पत्रकार अर्णव गोस्वामी

     जयपूर - मी राष्ट्रवादी असल्याचा मला अभिमान आहे. तुम्हाला कोणी भारताचा समर्थक म्हणाले, तर त्यात लाज कसली ? भारतीय प्रसारमाध्यमे राष्ट्रवाद आणि देशद्रोह यात फसलेली आहेत. भारतीय प्रसारमाध्यमांत देशद्रोह्यांना स्थान नाही. मी माझ्या देशासाठी पक्षपाती आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सूत्रावर मी तटस्थ होऊ शकत नाही, असे प्रतिपादन पत्रकार आणि निवेदक अर्णव गोस्वामी यांनी येथे केले. ते दैनिक भास्करने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. गोस्वामी यांनी नुकतेच टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीचे त्यागपत्र दिले आहे आणि ते स्वतःची वृत्तवाहिनी चालू करत आहेत.
अर्णव गोस्वामी यांनी मांडलेली सूत्रे
१. या देशात तुम्ही ओरडले नाही, तर तुमचा आवाज ऐकला जाणार नाही. त्यामुळे चर्चासत्राच्या वेळी मी ओरडतो.
२. एकदा राहुल गांधी यांनी मला माझे वय विचारले. मी म्हणालो, ४०. तर ते म्हणाले, माझ्यापेक्षा छोटे आहात. मी उत्तर दिले, हो ; पण माझ्याकडे १९ वर्षांचा कामाचा अनुभव आहे.
३. देहलीतील लुटियन्स भाग देशाच्या पत्रकारितेचे केंद्र होऊ शकत नाही. तेथील पत्रकारितेने देशाची एकच बाजू दाखवली. तडजोडी केल्या. कधीच भ्रष्टाचार उघडकीस आणला नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn