Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशाची म्लेंच्छबाधा दूर करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासा ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी यांना सनातन प्रभातचा
विशेषांक भेट देतांना श्री. दीपक आगवणे (डावीकडे)

        पिरंगुट (जिल्हा पुणे), ९ डिसेंबर (वार्ता.) - ज्याप्रमाणे भूतबाधा होते, अन्नातून विषबाधा होते, तशी या देशाला म्लेंच्छबाधा झाली आहे. ही बाधा नष्ट करायची असेल, तर प्रत्येक तरुणाने प्रखर धर्माभिमान आणि देशाभिमान चित्तात ठेवायला पाहिजे. त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करून संघटित आणि कृतीशील समाज निर्माण केला पाहिजे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने शिवचरित्रपारायण उद्यापन सोहळ्यानिमित्त ४ डिसेंबर या दिवशी त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी २ सहस्राहून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
        भारतावर झालेल्या भीषण इस्लामी आक्रमणांविषयी पू. भिडेगुरुजी म्हणाले, इस्लामी आक्रमकांच्या वाढत्या प्रभावामुळे भारत देश खंडित झाला. हिंदूंना आत्मविस्मृती झाल्यामुळेच उरलेला भारत आज हिंदुस्थान म्हणवून घेण्यास सिद्ध नाही. हिंदूंमध्ये एकीचे बीज नसल्याने आणि तत्कालीन राजांनी संस्थाने टिकवून ठेवण्यापुरताच विचार केल्याने देशावर परकीय आक्रमक आक्रमणे करू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र इस्लामी आक्रमणे परतवून लावतांना हिंदूंच्या स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेतला आणि पुढच्या वारसांनी अटकेपार झेंडे रोवून हिंदु साम्राज्याचा विस्तार केला.
गडकोटरूपी
शिवप्रभूंच्या 
सहवासात रहा ! - पू. भिडेगुरुजी
        छत्रपती शिवाजी महाराज गडकोटांच्या रूपाने आपल्यामध्ये आहेत. अनेक नरवीर या गडकोटांवर धारातीर्थी पडले आहेत. तरुणांनी गटकोटरूपी शिवप्रभूंच्या सहवासात राहिले पाहिजे. यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रतीवर्षी जानेवारीमध्ये गडकोटांच्या मोहिमांचे आयोजन केले जाते. या वर्षीही ११ ते १५ जानेवारी २०१७ या कालावधीत पन्हाळगड ते विशाळगडमार्गे पावनखिंड या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी व्हावे.
गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) एका 
आवाजावर आम्ही धावून येऊ ! - पू. भिडे गुरुजी
        कार्यक्रमाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी पू. भिडे गुरुजी यांची भेट घेऊन त्यांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दैवी कार्याविषयीचा विशेषांक भेट म्हणून दिला. त्या वेळी ते म्हणाले, सनातन प्रभातसारखे कोणतेही वृत्तपत्र मी पाहिले नाही. सनातन प्रभात प्रत्येक भाषेत निघायला हवे. सनातनचे कार्य मोठे आहे. आपल्या गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) केवळ एका आवाजावर आम्ही धावत येऊ.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn