Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शोकप्रस्ताव झाल्यानंतर परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

विधान परिषदेत विरोधकांचा नोटाबंदीवरील 
चर्चेचा प्रस्ताव सभापतींनी तूर्तास फेटाळला !
        नागपूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू झाले असून विधान परिषदेत विरोधकांनी नोटाबंदीवरील चर्चेचा प्रविष्ट केलेला प्रस्ताव सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तूर्तास फेटाळला आहे. हा प्रस्ताव फेटाळल्यावर विरोधकांनी सभेच्या कामकाजात घोषणा देत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभापतींनी १५ मिनिटांसाठी सभेचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर पुन्हा चालू झालेल्या कामकाजामध्ये दिवंगत झालेले विधान परिषदेचे सदस्य आणि हुतात्मा सैनिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नंतर परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यापेक्षा कामकाम चालू ठेवून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर ती खरी श्रद्धांजली ठरली असती ! - संपादक)
१. सभेचे कामकाज चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देशात आणि राज्यात नोटाबंदी प्रकरणावरून सर्वसामान्य जनतेला जो त्रास होत आहे, त्यावरून सभागृहामध्ये चर्चा करण्यात यावी, तसेच सरकारने त्यावर उत्तर द्यावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव सादर केला. त्यावर काँग्रेसचे आमदार नारायण राणे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही चर्चेला समर्थन देणारे भाषण केले.
२. त्या प्रस्तावावर बोलतांना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, विरोधी पक्षांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे राजकीय भांडवल करू नये. त्याकडे देशहिताच्या दृष्टीने पहावे. नोटाबंदीचा निर्णय हा देशामध्ये पहिल्यांदा घेतलेला नाही. जिल्हा सहकारी अधिकोषांमध्ये नोटा पालटण्यावर बंदी असल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह काही जणांचे शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन नेमकी समस्या मांडणार असल्याचे सांगितले.
३. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदर प्रस्ताव फेटाळतांना सांगितले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अशी चर्चा आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे आज यावर चर्चा न करता नंतर चर्चा करता येईल, असे सांगितल्यावर विरोधकांनी सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी केली.
४. या गोंधळातच अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थविषयक पुरवण्या विधान परिषदेत मांडल्या आणि त्या प्रविष्ट करून घेतल्याचे सभापतींनी घोषित केले. त्यानंतर सभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले. 
५. शोकप्रस्तावानंतर विधान परिषद आश्‍वासन समितीचा १९३ वा अहवाल, आमदार अनिल सोले अणि आमदार अनंत गाडगीळ यांचे ठराव प्रविष्ट केल्याचे सभापतींनी घोषित केले. 
क्षणचित्रे 
१. वन्दे मातरम् चालू होण्यापूर्वी काही सदस्यांनी जय विदर्भ आणि जय मराठवाडा, अशा घोषणा दिल्या. 
२. नोटाबंदीच्या चर्चेच्या प्रस्तावावरील चर्चेच्या कालावधीत सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, शरद रणपिसे आणि भाई जगताप यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.
३. शोकप्रस्तावावर काही सदस्य त्यांचे विचार मांडत असतांना अन्य काही सदस्य एकमेकांशी चर्चा करण्यात मग्न होते. 
विरोधी पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ !
        केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा मागण्या करून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. (मुलांप्रमाणे गोंधळ घालणारे विरोधी पक्षाचे सदस्य समाजाला दिशादर्शन काय करणार ? - संपादक) या गोंधळातच पुरवण्या मागण्या सभागृहात मांडण्यात आल्या. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने संमती दिली. सत्ताधार्‍यांनी सभेचे कामकाज चालू ठेवल्यामुळे विरोधकांनी काही काळ सभात्याग केला. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn