Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अयोध्येत राममंदिराची उभारणी करा ! - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी

     नवी देहली - हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्री रामचंद्रांचे अयोध्येत मंदिर व्हावे, अशी कोट्यवधी हिंदूंची मागणी आहे, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत नियम ३७७ नुसार १५ डिसेंबर या दिवशी केली. ६ डिसेंबरला भगवा संकल्प दिन, शौर्य दिन देशभरात साजरा केला गेला, तेव्हा सरकार राममंदिर उभारण्यासाठी पावले उचलील, अशी आशा होती; परंतु या संदर्भात सरकारने २ वर्षांत काहीच केलेे नसल्याचा खेद आहे, असे श्री. खैरे यांनी लोकसभेत मांडलेल्या सूचनेत म्हटले आहे.
     श्री. खैरे यांनी सूचनेत पुढे म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने घोषणापत्राच्या माध्यमातून अयोध्येत राममंदिर उभारणार, असे आश्‍वासन दिले होते. आता पूर्ण बहुमताने सरकार निवडून आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर राखून राममंदिराची उभारणी जलदगतीने चालू व्हावी, यासाठी पावले उचलायला हवीत. राममंदिराच्या संदर्भातील प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी उच्चस्तरीय न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करून राममंदिराच्या संदर्भातील वादावरील सुनावणी ६० दिवसांच्या काळात पूर्ण होईल आणि हा दीर्घ काळ प्रलंबित प्रश्‍न लवकर मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करावेत.
धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी निवेदन
     महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने काढलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याच्या अधिसूचनेमुळे संभाजीनगरसह मराठवाड्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी आणि नियमित करण्यासाठीही श्री. चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन सादर केले. यासंबंधी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्‍वासन राजनाथ सिंह यांनी दिले. ४० सहस्र धार्मिक प्रार्थनास्थळे वाचवण्याच्या संदर्भात मंदिर बचाव समितीच्या माध्यमातून न्यायालयातही कायदेशीर लढा देण्यात येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn