Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ठाणे तालुक्यातील शासनाचा कर चुकवणार्‍या १ सहस्र ५२६ भ्रमणध्वनींसाठी वापरण्यात येणार्‍या मनोर्‍यांवर कारवाई होणार

प्रामाणिकपणे कर भरणारी प्रजा हिंदु राष्ट्रातच असेल !
      ठाणे, १० डिसेंबर (वार्ता.) - गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे तालुक्यातील इमारतींच्या गच्चीवर असणार्‍या भ्रमणध्वनी मनोर्‍यांच्या (मोबाईल टॉवर) आस्थापनांनी अकृषिक कर न भरल्यामुळे इमारतींच्या पदाधिकार्‍यांना ठाणे तहसीलदारांच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु त्यांनी ७ डिसेंबरपर्यंत कर न भरल्यामुळे ८ डिसेंबरपासून कारवाईस आरंभ झाला आहे. ठाणे तालुक्यातील एकूण १ सहस्र ५२६ भ्रमणध्वनींसाठी वापरण्यात येणार्‍या मनोर्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे शासनाच्या तिजोरीत २ कोटींहून अधिक महसूल जमा होणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn