Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकमध्ये मुलांसह नाच केल्यामुळे ५ मुलींची अमानुष हत्या !

  • ६ वर्षांपूर्वीची घटना आली समोर
  • ‘भारतात असहिष्णुता आहे’, असे वाटणार्‍या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी 
    असहिष्णुता काय असते, हे पाकमधून शिकावे !
   इस्लामाबाद -
पाकमध्ये कोहिस्तान जिल्ह्यातील बाजीगा, सारीन जान, बेगम जान, अमिना आणि शाहीन या ५ मुली नारंगी रंगाचा स्कार्फ घालून मुलांसह नाच करतांनाची एक ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली होती. ही ध्वनीचित्रफीत पाहिल्यानंतर गावातील कुळ पंचायतीने मुलांसह नृत्य करणे पाप असल्याचे सांगत मुलींना ठार करण्याचा आदेश त्यांच्या कुटुंबियांना दिले. पंचायतीच्या आदेशाप्रमाणे कुटुंबियांनी मुलींच्या अंगावर गरम पाणी आणि गरम कोळसे टाकून त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या केली. या ध्वनीचित्रफितीमध्ये पाचही मुली मुलांसह नृत्य करतांना, हसतांना, गाण्यावर टाळ्या वाजवतांना दिसत होत्या. ही ६ वर्षांपूर्वीची घटना अलीकडेच समोर आली आहे.  या ध्वनीचित्रफितीत दिसणार्‍या अफझलच्या भावाचीही हत्या केल्याचे तपासातून समोर आले. अफझल गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अफझल म्हणाला, ‘‘माझ्या भावाचीही हत्या करण्यात आली आहे. त्या घटनेमुळे माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मलाही ठार मारण्यात येईल; मात्र याविरुद्ध कोणीतरी बोलायला हवे.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn