Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अर्थक्रांती नव्हे, तर अर्थसाक्षरतेकडचा प्रवास ! - अर्थतज्ञ डॉ. अभय टिळक

      पुणे, ६ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदीचा एकंदरीत निर्णय चांगला असला, तरी त्याचे अकल्पनीय परिणाम सर्वांना सोसावे लागतील. हा निर्णय म्हणजे अर्थक्रांती नसून अर्थसाक्षरतेकडे जाण्याचा प्रवास आहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘ऑन डिफरंट नोट’ या विषयावरील व्याख्यानात केले.      ते पुढे म्हणाले...
  • नोटाबंदीमुळे करातून मिळणारे उत्पन्न वाढून वित्तीय तूट अल्प होण्यास साहाय्य होईल. पायाभूत सेवासुविधांवर व्यय करण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध होईल. सर्व सुविधांचा दर्जा उंचावेल आणि महागाईला आळा बसेल. फेब्रुवारीमध्ये ७ राज्यांच्या निवडणुका असल्याने तेथे होणार्‍या आतंकवादी कारवायांना आळा घालण्यासाठीही या निर्णयाचा लाभ होणार आहे; पण नोटाबंदीच्या निर्णयाच्या आधी प्रशासनाचा दर्जा उंचावणे आणि सक्षमीकरण करणे अधिक आवश्यक होते.
  • जर सर्वांना एकच कर लावला, तर राजकीय विकेंद्रीकरण साध्य होईल; पण आर्थिक विकेंद्रीकरणाला आपण चालना देऊ शकणार नाही.
  • काळा पैसा हा प्रस्थापित अर्थव्यवस्थेमधील मोठ्या प्रमाणावरील धंदा आहे, हे रोखण्यासाठी सर्व गोष्टी पारदर्शक असणे आवश्यक आहे. जोपर्यंत ‘इ बँकिंग’चा वापर वाढत नाही आणि ‘इ साक्षरता’ निर्माण होत नाही, तोपर्यंत चलनरहित अर्थव्यवस्था शक्य नाही.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn