Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी अमरावती येथील पोलीस आयुक्तांना निवेदन !

      अमरावती - ख्रिस्ती नववर्षोत्सवानिमित्त ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार थांबवावेत, यासाठी येथील पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. नीलेश टवलारे, सौ. स्मिता ठाकरे, श्री. श्याम सांगूनवेढे, श्री. योगेश भागवतकर, श्री. संजय चौधरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
     पोलीस आयुक्तांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, आम्ही या वेळी विनाअनुमती कोणतेही कार्यक्रम चालू देणार नाही. तुम्हाला कोठेही अपप्रकार होतांना आढळल्यास तुम्ही आम्हाला सांगा. अन्य वेळीही हिंदुत्वनिष्ठांना चुकीचे काही जाणवल्यास ते आम्हाला सांगू शकतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn