Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनचे पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. चैतन्य आणि संतांचे अस्तित्व यांमुळे दिवसभरात 
१० ते ११ घंटे सेवा करून सर्व साधकांची मने दिवसभर उल्हासित असणे
     ‘आम्ही ११.२.२०१६ या दिवशी देवद येथील सनातन आश्रमाचे दर्शन घेतले. नंतर आम्ही सकाळी ११.३० वाजता आश्रमातील जेथे सनातनची ग्रंथसंपदा आहे तेथे पोचलो. येथे प.पू. भक्तराज महाराज, प.पू. गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अस्तित्व सतत जाणवते. या ठिकाणी सनातनची सर्व ग्रंथसंपदा, तसेच पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब), पू. नकातेकाका आणि पू. होनपकाका ही गुरुमाऊलींची रूपे दिवसभर कार्यरत असतात. सर्व साधक दिवसभरात १० ते ११ घंटे सेवारत असूनही कुणाच्याही मनावर कोणताही ताण जाणवत नाही, उलट सर्व साधकांची मने दिवसभर उल्हासित असतात.
२. पू. भाऊकाकांसमवेत सेवा करतांना ‘प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरच 
शेजारी असून तेच त्यांना अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करवून घेत आहेत’, असे वाटणे
     देवद आश्रमात सेवेसाठी आल्यापासून माझ्याकडून ‘सेवेतील सर्व बारकावे, तसेच ‘कोणती सेवा कशा पद्धतीने परिपूर्ण करावयाची ? घाईगडबड न करता परिपूर्ण आणि अचूक सेवा कशी होईल’, हे पाहिले जाऊ लागले. तेथील प्रत्येक साधक प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. मला पू. भाऊकाका यांच्यासमवेत सेवा करतांना ‘प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरच शेजारी असून तेच त्यांना अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करवून घेत आहेत’, असे वाटले. 
३. सर्व साधकांकडून प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी परिपूर्ण 
सेवा व्हावी, अशी तळमळ असणारे पू. भाऊकाका परब !
अ. तेथे पू. भाऊकाका ‘आपल्याला चांगली स्पंदने मिळतील’, या दृष्टीने सेवेतील बारकावे समजावून सांगत होते, उदा. खोक्यात ग्रंथ ठेवतांना तो चांगल्या पद्धतीने कसा ठेवता येईल. 
आ. एकदा ग्रंथमोजणी चालू असतांनाच ग्रंथांची आवक मोठ्या प्रमाणात आली. तेव्हा तीन-चार गट ग्रंथांची खोकी भरण्याची सेवा करत होते. त्या वेळी पू. भाऊकाका प्रत्येकाकडे लक्ष देऊन ‘सर्व सेवा योग्य पद्धतीने होतात का ?’, हे पहात होते. तसेच त्या वेळी लक्षात येणार्‍या गोष्टी योग्य पद्धतीने समजावून सांगत होते आणि ते ‘सांगितलेले समजले का ?’, हे प्रत्येकास विचारूनही घेत होते.
इ. पू. भाऊकाका ‘प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे का ? खोक्यात ग्रंथ भरल्यानंतर वरती कागद घातला का ? खोक्यात कापूर घातला का ? ग्रंथाच्या मध्ये जागा शेष असल्यास कागदाचे ‘पॅकिंग’ घातले का ? सेवा शेवटपर्यंत पूर्ण झाली का ? त्यात काही राहिले नाही ना ?’ हे पाहून घेत होते. तसेच ग्रंथांची मोजणी पूर्ण झाल्यावर खोक्यावर योग्य पद्धतीने नोंद करवून घेत होते. 
ई. ग्रंथांच्या बांधणीच्या सेवेविषयी पू. भाऊकाका सांगतात, ‘‘खोक्यात सर्व ग्रंथ एकाच दिशेने ठेवल्याने चांगली स्पंदने येतात. ग्रंथ खोक्यात चांगल्या स्थितीत रहावेत; म्हणून खोक्यात वरच्या बाजूला कापूर घालावा. कोणतीही सेवा करतांना लक्ष नामाकडे हवे. तसेच अधूनमधून प्रार्थना करणे आणि झालेल्या सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.’’ 
उ. साधकांना ‘प्रत्येक साधकास सर्व प्रकारची सेवा करता यावी’ आणि ‘अहं लवकर न्यून व्हावा’, यांसाठी आश्रमसेवा करावयास देतात. त्याचा लाभ साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेत होतो. 
ऊ. विविध सेवा सांगण्यामागे प.पू. डॉक्टरांचा ‘माझ्या प्रत्येक साधकाने पुढच्या पुढच्या टप्प्यावर जाऊन साधना करावी’, हा दृष्टीकोन असतो.’
ए. पू. भाऊकाकांची पुष्कळ भजने तोंडपाठ असल्यामुळे ते काही वेळा भजनांची कडवी म्हणवून दाखवत आणि भजनांचा भावार्थही समजावून सांगत. 
     अशा प्रकारे पू. भाऊकाका सर्व साधकाकडून गुरुमाऊलीस अपेक्षित अशी अचूक सेवा होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करवून घेत होते, तसेच सर्व साधकांची ‘व्यष्टी साधना योग्य पद्धतीने होते ना ?’, याचीही काळजी घेत होते. 
- श्री. गोरखनाथ लिमकर, सांगली (५.४.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn