Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केंद्रशासनाकडून ५०० बँकांमध्ये स्टिंग ऑपरेशन !

राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचाराची लागण झालेले बँक कर्मचारी !
जनतेला त्रास होत असतांना स्वतःचे उखळ पांढरे करून घेणार्‍यांची
सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !
नोटाबंदीचा अपलाभ घेणार्‍या बँक कर्मचार्‍यांवर कारवाई होणार !
      नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक बँकांमधील व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी अवैधरित्या नोटा पालटून दिल्या. या सगळ्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. त्याच्या ४०० सीडी (ध्वनीचित्र-चकत्या) अर्थ मंत्रालयाकडे जमा झाल्या आहेत. बँकांमध्ये काही मोजक्या लोकांची मोठी रक्कम पोलीस, दलाल आणि बँक कर्मचारी कशाप्रकारे पालटून देतात, याची सर्व माहिती या ४०० सीडींमध्ये आहे. मोठ्या शहरांबरोबरच काही लहान शहरांमधील बँकांमध्येही स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे.
     काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेच्या २ व्यवस्थापकांना ४० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अ‍ॅक्सिस बँकेकडून १९ कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोलकात्यात कॅनरा बँकेच्या उपव्यवस्थापकावर, तर राजस्थानातील अलवरमध्ये को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आली आहे. पंजाबमधील भटिंडातील ओबीसी बँकेचे व्यवस्थापक आणि रोखपाल यांच्यावर कारवाई झाली आहे. बेंगळुरूमध्ये सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाला, तर भाग्यनगरमध्ये सिंडिकेट बँकेच्या २ कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे.
     नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांमध्ये गेल्या मासात २०० कोटी रुपयांचे अपहार झाले आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. काही मोजक्या व्यक्तींच्या हाती अवैध मार्गाने गेलेला हा पैसा सामान्य माणसाच्या वाट्याला आला असता, तर किमान २० लाख लोकांना प्रत्येकी २ सहस्र रुपये मिळू शकले असते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn