Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नेरूळ (नवी मुंबई) येथील संत तुकाराम महाराज और इस्लाम हा वादग्रस्त परिसंवाद रहित !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटनाचा परिणाम !
        नवी मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - कुरआन द ट्रूथ फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी येथील डी.वाय्. पाटील सभागृह येथे संत तुकाराम महाराज आणि इस्लाम या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. याविषयी विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. हिंदुत्ववाद्यांचा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी या कार्यक्रमाला अनुमती नाकारली. त्यामुळे अखेर आयोजकांना हा कार्यक्रम रहित करावा लागला. याविषयी पोलिसांना निवेदन देतांना विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. कृष्णा बांदेकर, तुर्भे येथील वारकरी श्री. रामनाथ म्हात्रे, भाजपचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष प्रा. मारुती मतलापुरकर, नवी मुंबईचे उपाध्यक्ष श्री. शशी भानुशाली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवी मुंबईचे धर्मजागरण प्रसारप्रमुख श्री. सुरेशसिंग राणा आणि श्री. राजीव रेड्डी हे उपस्थित होते.
        या कार्यक्रमाच्या अनुमतीसाठी आयोजकांनी पोलिसांना दिलेल्या अर्जामध्ये हा कार्यक्रम अमली पदार्थांच्या विरोधात असल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात मात्र अशा आशयाच्या विषयाचा कार्यक्रमाच्या रूपरेषेत समावेश नव्हता. याविषयी विश्‍व हिंदु परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये कार्यक्रमाचे प्रसार साहित्य पहाता हा कार्यक्रम संदर्भहीन आणि अतार्कीक असल्यामुळे यातून विवाद निर्माण होऊ शकतो. तसेच कार्यक्रमात चिथावणीखोर भाषणे होऊ शकतात, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजकांचे देशद्रोही झाकीर नाईक यांच्या संस्थेशी संबंध आहेत का ? याविषयी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. हा कार्यक्रम ज्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्या सभागृहाचे मालक श्री. विजय पाटील यांनाही कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये, यासाठी निवेदन दिले होते. हा विषय जाणून घेतल्यावर सभागृहाचे मालक श्री. विजय पाटील यांनी कार्यक्रमाला सभागृह उपलब्ध करून देण्यास नकार दिला. (धर्मद्रोही कार्यक्रमाची माहिती मिळताच त्याला सभागृह न देण्याचा निर्णय घेणारे श्री. विजय पाटील यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यामुळे अखेर आयोजकांना हा कार्यक्रम रहित करावा लागला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn