Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भारतात कोणतेही मोबाईल बँकिंग अ‍ॅप सुरक्षित नाही !

  • ‘मोबाईल चिप’ बनवणारे जगातील प्रमुख आस्थापन ‘क्वालकॉम’चे मत
  • ‘ऑनलाईन पेमेंट्स’च्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह !
नवी देहली - काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार रोखीने व्यवहार करण्याऐवजी ‘कॅशलेस’ (रोखरहित) व्यवहार आणि ‘ई-बॅकिंग’ यांना प्रोत्साहन देत आहे; मात्र ‘देशातील कोणतेही ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप’ सुरक्षित नाही’, असे ‘मोबाईल चिप’ बनवणारे जगातील प्रमुख आस्थापन ‘क्वालकॉम’चे म्हणणे आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन पेमेंट्स’च्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
१. ‘क्वालकॉम’चे वरिष्ठ अधिकारी एस्.वाय. चौधरी यांनी सांगितले की, भारतात कोणतेही सर्वसाधारण वॉलेट ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप्लीकेशन हार्डवेअर लेव्हल सेक्युरिटी’ या संरक्षणात्मक प्रणालीचा वापर करत नाही. या प्रणालीमुळे ‘ऑनलाईन’ व्यवहार अधिक सुरक्षित ठेवता येऊ शकतात. २. आज ‘अ‍ॅप’ वापरणार्‍यांचा ‘पासवर्ड’ सहजपणे चोरता येणे शक्य आहे. ‘अ‍ॅप’ वापरणार्‍यांच्या बोटाचे ठसेही मिळवता येऊ शकतात. भारतात ‘डिजिटल वॉलेट्स’ आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप्स यांसाठी ही मोठी चिंता आहे.
३. चौधरी म्हणाले, ‘‘आम्ही ‘ओरिजिनल इक्विपमेंट मेकर्स’सह काम केले आहे. कोणतेही आस्थापन त्यांच्या अ‍ॅपमध्ये ‘हार्डलेवल सिक्युरिटी’चा वापर करत नाही. मोबाईल पेमेंट अधिक सुरक्षित होण्यासाठी ‘क्वालकॉम’ डिजिटल पेमेंट आस्थापनांच्या संपर्कात आहोत. आम्ही ‘मोबाईल चिप’मध्ये लोकांना पूर्णत: सुरक्षितता देत आहोत.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn