Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

घराघरात खेळला जाणारा ‘सापशिडी’ हा खेळ संत ज्ञानदेवांच्या काळात ‘मोक्षपट’ या नावाने ओळखला जात असणे

१. ‘सापशिडी’ हा खेळ संत ज्ञानदेवांच्या काळात ‘मोक्षपट’ या 
नावाने ओळखला जात असल्याचे संशोधनातून समोर येणे
     ‘घराघरात खेळला जाणारा ‘सापशिडी’ हा खेळ साक्षात् ज्ञानेश्‍वर माऊलींनीही खेळला असावा’, असे दाखले मिळाले आहेत. ज्ञानदेवांच्या काळात हा खेळ ‘मोक्षपट’ या नावाने ओळखला जात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. डेन्मार्क येथील प्राध्यापक जेकॉब यांच्या संशोधनातून हा ‘मोक्षपट’ उलगडला आहे.
२. भारतभरातून अनेक सापशिड्यांचे पट मिळवनूही त्यामध्ये ज्ञानदेवांचा 
उल्लेख कुठेच नसणे आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. 
मंजुळ यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये संदर्भ असल्याचे सांगणे अन् ‘मोक्षपटा’चा उलगडा होणे
    ‘ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत ‘संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात खेळले जाणारे खेळ’, असा विषय संशोधनासाठी घेतला. त्यासाठी त्यांनी त्या काळी ‘कोणते खेळ खेळले जात असावेत’, यावर संशोधन सुरू केले. सापशिडीचा खेळ त्याही काळात खेळला जात होता, अशी माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी भारतभरातून अनेक सापशिड्यांचे पट मिळवले; पण त्यामध्ये ज्ञानदेवांचा उल्लेख कुठेच नव्हता. ज्ञानदेवांची अनेक चरित्रे वाचल्यानंतर त्यांना कुठेही तशा प्रकारचे संदर्भ सापडले नाहीत. त्यांनी या संदर्भात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. मंजुळ यांच्याकडे विचारणा केली असता मंजुळ यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपटा’चा उलगडा झाला. जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये श्री. रा.चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले आहेत.
३. असा आहे मोक्षपट !
     मोक्षपटाचे दोन्ही पट २० × २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटांमधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा कवड्यांचा वापर करावा लागतो. सहा कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या, तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर अशा षड्रिपूंची नावे त्यांना देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे. तिला सत्संग, दया आणि सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. ‘माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे ?’, याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.
४. मोक्षपटाच्या हस्तलिखितावर ओव्यांद्वारे संदेश असणे
    मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये ‘आयुष्य कसे जगावे, कोणती कवडी पडली की, काय करावे’, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. केवळ गंमत म्हणून सापशिडीचा खेळ खेळणार्‍या लहान मुलांना आता त्यांचे आई-बाबा आणि आजी-आजोबा मोक्षपटाचा आधार घेत जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगू शकतील. ‘सापशिडी आधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील’, यात काही शंका नाही.’ 
(संदर्भ : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संकेतस्थळ)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn