Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एकाग्र, अष्टावधानी आणि देवाप्रती भाव असणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील चि. देवश्री गोविंद जोशी (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके
म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !

या पिढीतील चि. देवश्री जोशी आणि चि. रुद्र गोबाडे ही दोन दैवी बालके आहेत !
    (चि. देवश्री हिची वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. आता ६४ टक्के आहे.)
    चि. देवश्री गोविंद जोशी हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२०.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
चि. देवश्री गोविंद जोशी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून आशीर्वाद !
चि. देवश्री जोशी
पालकांनो, हे लक्षात घ्या !
    तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले    
१. एकाग्रता आणि एकपाठी असणे
    चि. देवश्रीला एकदा सांगितलेली गोष्ट लक्षात रहाते आणि त्याप्रमाणे ती लगेच कृतीही करते. तिला आतापर्यंत २ वेळाच बालसंस्कारवर्गाला नेले होते. त्या वेळी तिथे पाहिलेली ध्यानमुद्रा आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप तिच्या लक्षात राहिला. आता केव्हाही बालसंस्कारवर्गाचे नाव उच्चारले की, ती मुद्रा करते आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप म्हणून दाखवते.

२. अष्टावधानी आणि तीक्ष्ण बुद्धी
    देवश्रीचे एकाच वेळी सर्वत्र लक्ष असते. हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी माझ्याकडे बालकक्षाची सेवा होती. या कक्षाची पूर्वसिद्धता करतांना सेवेत सहभागी झालेल्या मुलांकडून मी घोषणा देण्याचा सराव करून घेत होते. त्या वेळी देवश्रीने मुलांचा सराव पाहिला होता. त्याप्रमाणे तीही सर्व प्रकारच्या घोषणा देते. प्रत्येक घोषणा तिला मुखोद्गत आहे.
३. आध्यात्मिक उपायांचे गांभीर्य
    देवश्रीला काही त्रास होत असेल, तर ती स्वतः विभूती लावते. घरातील इतर कुणालाही त्रास होत असेल, तर त्या वेळी त्यांना विभूती लावण्याची ती आठवण करून देते.
- सौ. रोहिणी गोविंद जोशी (देवश्रीची आई), संभाजीनगर (२३.३.२०१६)
४. प्रेमभाव
    घरी पाहुणे आल्यास देवश्री त्यांना पाणी देऊ का ?, असे विचारते. जेवतांना मला ठसका लागल्यास पटकन पाणी आणून देते. मी काही गोड पदार्थ बनवला असेल, तर लगेच ती मामाच्या मुलांना आणि तिच्या भावालाही खाऊ खायला बोलावते.
५. देवाविषयी भाव असणे
५ अ. देवाची आरती करतांना देवश्री आरतीतील शब्द म्हणण्याचा प्रयत्न करते.
५ आ. नामजप करणे : देवश्रीला प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेली प्रार्थना संपूर्ण म्हणता येते. (देवद येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असणारे संत प.पू. पांडे महाराज यांनी सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना दिवसातून ३ वेळा करण्यासाठी प्रार्थना सांगितली आहे.) ही प्रार्थना म्हणण्याची देवश्री आम्हाला आठवण करून देते. नामजप करतांनाही देवश्री मुद्रा करून नामजप करते. पूर्वी ती शिव, दत्त आणि गणपति या देवतांचा नामजप करत असे. आता ती महर्षींनी सांगितलेला ॐ निसर्गदेवो भव... हा पूर्ण नामजप करते.
५ इ. झोपतांना तिला भजने ऐकायला आवडतात आणि स्वतःही भजने चांगल्या प्रकारे म्हणते.
६. समंजसपणा
    घरी कुणी आले, तर त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना काका, दादा, आजोबा, आजी असे म्हणते. जेवणाची सिद्धता करतांना जेवायला किती जण बसणार आहेत, त्यानुसार आसने घेऊन येते.
७. शिस्तबद्धता आणि नेतृत्वगुण
७ अ. मांडी घालून जेवायला बसण्यास सांगणे : माझे पाय दुखतात; म्हणून मी काही वेळा जेवायच्या वेळी पाय पसरून बसते. त्यावर देवश्री लगेच मला सांगते, मांडी घालून जेवायला बसावे. मी कशी मांडी घातली आहे बघ. तिच्या आजोबांनाही ती मांडी घालून बसायला सांगते.
७ आ. सर्वांनी हात जोडून प्रार्थना करावी, यासाठी प्रयत्न करणे : प्रार्थना करतांना देवश्री समोर बसलेल्या सर्वांना हात जोडून प्रार्थना म्हणण्यास सांगते. सर्वांनी हात जोडण्याची कृती करीपर्यंत ती वाट पहाते.
- सौ. सुलभा सुरडकर (देवश्रीची आजी), संभाजीनगर (२३.३.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn