Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिदु युवकांनो, देश आणि धर्म यांसाठी समर्पित व्हा !

भाग्यनगर येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांचे आवाहन !
कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती
ज्यांना हिंदु धर्माचे कार्य करायचे आहे, त्यांनी हिंदु जनजागृती
समितीला जोडून घेऊन कार्य केले पाहिजे ! - श्री. राजासिंह ठाकूर
श्री. राजासिंह ठाकूर
   कोल्हापूर - ‘लव्ह जिहाद’सारखी अनेक संकटे आज आपल्यासमोर आहेत. राज्यकर्ते मतपेढीच्या राजकारणात मग्न असल्याने ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणार्‍यांना प्रत्युत्तर दिले जात नाही. बांगलादेशातील हिंदूंना वेचून वेचून मारले जात आहे, तर भारतात ख्रिस्ती आणि इस्लामी हे हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी हिंदवी स्वराज्य स्थापन करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भावना होती, ती आपल्याला जागृत करावी लागेल. तरी हिंदु युवकांनो, देश आणि धर्म यांसाठी तन, मन, धन समर्पण करण्याची सिद्धता ठेवा, असे जाज्वल्य आवाहन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. रविवार, ११ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. हिंदूंमध्ये राष्ट्रकार्यासाठी उत्साह निर्माण करणारी ही सभा पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणात पार पडली. या सभेत सनातन संस्थेच्या प्रसारसेविका सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सोलापूर जिल्हा रणरागिणी शाखेच्या संघटक सौ. अलका व्हनमारे आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनीही मार्गदर्शन केले.
४ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमान्यांनी या सभेला उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठ विचारांना पाठिंबा दर्शवला. सभेच्या प्रारंभी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
     श्री. राजासिंह ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती संदीप निगुडकर, प्रसाद निगुडकर, विशाल जोशी यांनी म्हटलेल्या वेदमंत्रपठणानंतर चैतन्यदायी वातावरणात सभेला प्रारंभ झाला. सनातनने प्रकाशित केलेला ‘शारिरीक विकारोंके लिए स्वसंमोहन उपचार’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ आणि ‘अ‍ॅण्ड्रॉईड सनातन पंचांग २०१७’चे प्रकाशन या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा आणि आभारप्रदर्शन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. अभिजित देशमुख यांनी केले. श्‍लोकाने सभेची सांगता झाली.
फेसबूकवरील थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून देश-विदेशातून
८ सहस्र ५०० धर्माभिमान्यांनी सभा अनुभवली !
     ‘फेसबूक लाइव्ह’च्या माध्यमातून हिंदु धर्मजागृती सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ते देश-विदेशातील ८ सहस्र ५०० धर्माभिमान्यांनी पाहिले. ५२५ हून अधिक ऑनलाईन दर्शकांनी ‘सभा अप्रतिम आणि हिंदूंना दिशादर्शन करणारी आहे, असे मत समितीच्या फेसबूकच्या पानावर नोंदवले. ‘संपूर्ण भारतात असे परखड सत्य मांडणारी संघटना नाही. समितीच्या सभेमुळे हिंदु धर्माविषयी माहिती मिळाली, यांसारख्या अनेक प्रतिक्रिया या वेळी दर्शकांनी नोंदवल्या. याचप्रकारे व्हॉट्स अ‍ॅपवरही त्या त्या वेळी झालेले प्रसंग पोस्ट करण्यात येत होते.
प्रथम मी हिंदु आहे ! असे सांगून पदत्यागाचीही सिद्धता असणारे
राजासिंह ठाकूर हे अभिमान वाटावा असे हिंदु लोकप्रतिनिधी !
     मला या सभेला येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही झाला. ‘तुम्ही एक आमदार आहात, असे सांगून इतर अनेक गोष्टी सांगण्यात आल्या; मात्र ‘ही सभा माझ्यासाठी प्राधान्य असून मी त्यासाठी जाणारच !’, असे मी ठामपणे सांगितले. प्रथमत: मी हिंदु आहे, नंतर लोकप्रतिनिधी आहे. प्रसंगी मला लोकप्रतिनिधीपद सोडावे लागले, तरी हरकत नाही; मात्र मी हिंदु धर्मासाठी कार्य करतच रहाणार !’’
जगभरातील राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात हिंदूंपर्यंत पोचवणारे
एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय ! - राजासिंह ठाकूर
     दैनिक सनातन प्रभातविषयी गौरवोद्गार काढतांना श्री. राजासिंह ठाकूर म्हणाले, ‘‘दैनिक सनातन प्रभात’ प्रत्येकाने वाचले पाहिजे. प्रत्येकाने त्याचे वर्गणीदार झाले पाहिजे. सनातनच्या संकेतस्थळाला भेट द्या आणि तेथील व्हिडिओ डाऊनलोड करा. जगभरातील राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात हिंदूंपर्यंत पोेचवणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय !’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn