Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ !
विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय
  • भाग १ - महत्त्व आणि उपायपद्धतीमागील शास्त्र
  • भाग २ - खोक्यांचे उपाय कसे करावेत ?
      संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. २४.१२.२०१६ या दिनांकापर्यंत या मालिकेतील १३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)’ या ग्रंथाचा परिचय २ लेखांद्वारे (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांद्वारे) करून देत आहोत. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. या ग्रंथाचे दोन्ही भाग वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. पूर्वार्ध
आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक : परात्पर गुरु डॉ. आठवले !
आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे विवेचन करणारे
जगाच्या पाठीवरील एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !
     व्यक्तीला होणार्‍या शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण बहुतेक वेळा आध्यात्मिक असते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाईट शक्तींचा त्रास. हे त्रास दूर होण्यासाठी आजवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांच्या अनेक नवनवीन पद्धतींचे विवेचन केले आहे, उदा. देवतांचा एक-आड-एक नामजप, प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय. या उपायपद्धतींचा सनातनच्या शेकडो साधकांना लाभ होत असल्याने या पद्धती प्रमाणभूत शास्त्रेच झाली आहेत. यांतीलच एक पद्धत म्हणजे, ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः खोक्यांच्या उपायांच्या संदर्भात विविध प्रयोग केले आणि अनुभव घेतला. सनातनच्या शेकडो साधकांनीही या उपायांचे प्रयोग केले आणि त्यांना लाभ झाला. या उपायपद्धतीचे साधकांना झालेले लाभ लक्षात आल्याने आता ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांसमोर ही उपायपद्धत प्रस्तुत करत आहोत.
विदेशातील लोकही लाभ घेत असलेली उपायपद्धत
      ‘स्पिरीच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेच्या ‘www.ssrf.org’ या संकेतस्थळावर ‘बॉक्स थेरपी (रिकाम्या खोक्यांचे उपाय)’ याविषयीचे विवेचन ठेवण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक विदेशी लोकांनीही या उपायपद्धतीचा लाभ करून घेतला आहे. एका वाचकाची यासंदर्भातील पुढील प्रतिक्रिया बोलकी आहे.
      ‘मी खोक्यांचे उपाय केल्यावर माझ्या पाठीतून काहीतरी बाहेर पडल्याचे मला जाणवले. त्यानंतर माझ्या डोक्यातील ट्यूमर काढलेल्या स्थानी खोका ठेवल्यावर मला कानाजवळ वेदना झाल्या आणि अंग शहारले. दुसर्‍या दिवशी मात्र मला नवजीवन मिळाल्याप्रमाणे वाटले. यामुळे खोक्यांचे उपाय मला नाविन्यपूर्ण वाटतात.’ - श्री. सेबॅस्टियन अलझान्ड्रो ऑर्टिझ (‘www.ssrf.org’च्या ‘स्पॅनिश फेसबूक’वरील अभिप्राय)
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवी जीवन त्रासमुक्त आणि आनंदी बनवणारी ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ ही अत्यंत सोपी पद्धत शोधून अखिल मानवजातीवर उपकार केले आहेत. हे उपकार कधीही फेडता येणार नाहीत, असे आहेत. त्यांनी मानवजातीवर केलेल्या या उपकारांसाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत !
- (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक
मनोगत 
     रिकाम्या खोक्यात पोकळी असते. पोकळीत आकाशतत्त्व असते. आकाशतत्त्वामुळे आध्यात्मिक उपाय होतात. आध्यात्मिक उपायासाठी खोके वापरल्याने व्यक्तीचा देह, मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण, तसेच व्यक्तीमधील त्रासदायक शक्ती खोक्यातील पोकळीत खेचली जाऊन नष्ट केली जाते. या योगे विकारांमागील मूळ कारणच नष्ट केले जात असल्याने विकारही लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.
     खोक्यांचे उपाय, ही अत्यंत सोपी आणि बंधनविरहित उपायपद्धत आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात खोक्यांचे शास्त्रीय महत्त्व सांगण्यासह खोक्यांचे उपाय करण्याची शरिरातील विविध स्थाने, खोका कसा बनवावा आदींविषयी विवेचन केले आहे. ग्रंथाच्या दुसर्‍या भागात विकारांनुसार विशिष्ट मापांचे खोके वापरणे; खोक्यांचे उपाय करण्याच्या विविध पद्धती; दैनंदिन कामकाज, अभ्यास इत्यादी करतांनाही खोक्यांचे उपाय करणे आदींविषयी मार्गदर्शन केले आहे. आजकाल अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. शांत झोप लागण्यासाठी साहाय्यक ठरणारे खोक्यांचे उपाय कसे करावेत, याचेही विवेचन या भागात केले आहे. खोक्यांचे उपाय करतांना नामजप आणि मुद्रा किंवा न्यासही केला, तर उपायांची फलनिष्पत्ती वाढते. यासाठी ग्रंथाच्या या दुसर्‍या भागात तेही सांगितले आहेत.
     ‘खोक्याचे उपाय करून जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर विकारमुक्त होवोत’, ही श्री गुरुचरणी आणि विश्‍वपालक श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना !
१. रिकाम्या खोक्याविषयी सर्वसाधारण विवेचन
१ अ. खोका कोणत्या मापाचा असावा ?
१ अ १. खोक्याच्या मापाविषयीचा दृष्टीकोन

अ. मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांनी (पंचमहाभूतांनी) बनलेले आहे. या पंचतत्त्वांचे शरिरातील संतुलन बिघडल्यास शरिरात विकार निर्माण होतात. विकार पंचतत्त्वांपैकी कोणत्या तत्त्वाशी संबंधित आहे, त्या तत्त्वाशी संबंधित असलेल्या मापाचा खोका वापरणे, हे त्या विकाराच्या निर्मूलनासाठी १०० टक्के लाभदायक ठरते, तर सर्व पंचतत्त्वे समाविष्ट असणारा, म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायचा खोका हा त्या विकाराच्या निर्मूलनासाठी ७० टक्के लाभदायक ठरतो. त्या त्या विशिष्ट पंचतत्त्वाशी संबंधित असलेले खोक्याचे विशिष्ट माप कोणते, याविषयी ग्रंथात सांगितले आहे. या लेखात केवळ सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायच्या खोक्याचे माप सांगितले आहे.
    एखाद्याला विविध विकारांनुसार विविध मापांचे खोके बनवणे शक्य नसेल, तर त्याने सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायचा खोका उपयोगात आणला तरी चालू शकेल.
१ अ २. सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायच्या खोक्याचे माप
१ अ २ अ. खोक्याची लांबी, रुंदी अन् खोली (उंची) यांचे एकमेकांशी प्रमाण (गुणोत्तर) - १० : ७ : ६
१ अ २ आ. खोक्याचे सर्वसाधारण माप : २५ सें.मी. लांब × १७.५ सें.मी. रुंद × १५ सें.मी. खोल (उंच) 
सर्वसाधारण मापाचा खोका
    वरील मापात १० टक्के अल्प-अधिक असलेला तयार (रेडीमेड) खोकाही चालू शकतो.
(खोका बनवण्याविषयीचे सचित्र विवेचन ग्रंथात केले आहे.)
१ अ ३. मोठा खोका आणि लहान खोका यांची उपयुक्तता
अ. मोठा खोका : सभोवताली खोके ठेवून उपाय करणे, झोपतांना अंथरुणाभोवती खोके ठेवणे आदींसाठी मोठे (सर्वसाधारण मापाचे किंवा त्यापेक्षा मोठ्या मापाचे) खोके वापरावेत.
आ. लहान खोका : प्रवास करतांना खोक्यांचे उपाय करणे, खोक्यांचे शिरस्त्राण (हेल्मेट) बनवणे आदींसाठी लहान खोके वापरावेत.
१ अ ४. ‘खोका कोणत्या मापाचा आहे’ यापेक्षा ‘खोका वापरण्यामागील भाव’ महत्त्वाचा ! : खोका कोणत्याही मापाचा असला, तरी खोक्याचे उपाय करतांना भाव ठेवला, तर कोणत्याही मापाच्या खोक्याद्वारे उपाय होतात. असे असले, तरी भाव ठेवून योग्य मापाचा खोका उपायांसाठी वापरला, तर उपायांची फलनिष्पत्ती निश्‍चितच अधिक मिळते.
१ आ. खोका शक्यतो पांढर्‍या रंगाचा असावा !
१ इ. खोक्याच्या पोकळीला अधिक महत्त्व असून ‘खोका कशापासून बनवला आहे’, याला गौण महत्त्व असणे : आपत्काळात एखाद्या वेळी खोका वापरणे शक्य नसल्यास घरातील बालदी, पातेले, डबा यांसारख्या वस्तूंचाही उपायांसाठी उपयोग करू शकतो.
२. खोक्यांचे उपाय करण्याची शरिरातील स्थाने 
 २ अ. प्राधान्याने शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करावेत
२ अ १. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करण्यामागील शास्त्र : ब्रह्मांडातील प्राणशक्ती (चेतना) मनुष्याच्या शरिरातील कुंडलिनीचक्रांमध्ये ग्रहण केली जाते आणि त्या त्या चक्राद्वारे ती शरिरातील त्या त्या इंद्रियापर्यंत पोचवली जाते. इंद्रियामध्ये प्राणशक्तीच्या वहनात (चेतनेच्या प्रवाहात) अडथळा निर्माण झाला की, विकार निर्माण होतात. यासाठी वाईट शक्ती प्रामुख्याने कुंडलिनीचक्रांवर आक्रमण करून तेथे त्रासदायक (काळी) शक्ती साठवून ठेवतात. यावर उपाय म्हणून कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी खोक्यांचे उपाय करणे महत्त्वाचे ठरते.
(कुंडलिनीचक्रांच्या स्थानांव्यतिरिक्त विकारग्रस्त अवयवांच्या स्थानीही खोक्यांचे उपाय करता येतात.)
२ अ २. विकारांनुसार कोणत्या कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करावेत ?
 
 
टीप १ - मूलाधारचक्राच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितलेले नाही; कारण या चक्राच्या ठिकाणी न्यास करणे कठीण असते.
टीप २ - सहस्रारचक्र : हे कुंडलिनीच्या षट्चक्रांमध्ये गणले न जाता स्वतंत्र चक्र म्हणून गणले जाते. ब्रह्मांडातील प्राणशक्ती या चक्रामधूनच शरिरात प्रवेश करते. या चक्राला ‘ब्रह्मद्वार’ असेही म्हणतात. सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सहस्रारचक्र बंद असते. साधनेत प्रगती झाल्यानंतर ते उघडते. त्यामुळे अन्य व्यक्तींच्या तुलनेत साधनेत प्रगती झालेल्याने सहस्रारचक्राच्या ठिकाणी न्यास केल्यास त्याला अधिक लाभ होतो.
(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)’)
टीप : वाचकांनी प्रस्तुत ‘पूर्वार्ध’ संदर्भासाठी जपून ठेवावा.
वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !
     अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आध्यात्मिक उपायासाठी खोके वापरल्याने व्यक्ती आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो इत्यादी विषयांसंदर्भात ‘पी.आय.पी.’ आणि ‘यू.टी.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून संशोधन केले आहे. यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक आणि यासंदर्भात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी यांनी साहाय्य करावे, ही विनंती ! 
 
सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाईन’ खरेदी करा !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
     सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn