Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फिरोजाबाद येथे धर्मांध अधिवक्त्याकडून गायत्री मंत्राविषयी अश्‍लील मजकूर व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित !

  • जिल्हा न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांकडून आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
  • धर्मांध उच्चशिक्षित असले, तरी त्यांची मूळ हिंदुविरोधी वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्या !
    फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) - येथील एका धर्मांध अधिवक्त्याने गायत्री मंत्राला अश्‍लील संबोधून मंत्राचा चुकीच्या पद्धतीने उच्चारण असलेला मजकूर सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित केला. धार्मिक भावना भडकवणारा हा मजकूर भ्रमणभाषवर दिसताच जिल्हा न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते संतप्त झाले. त्यांनी अश्‍लील मजकूर टाकणारे अधिवक्ता महंमद यामीन यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. अधिवक्त्यांनी अश्‍लील मजकूर प्रसारित करणारे यामीन यांचा शोध घेतला; मात्र ते फरार झाले होते.    जिल्हा न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता शीलेन्द्र प्रताप सिंह चौहान यांना भ्रमणभाषवर गायत्री मंत्राची अश्‍लील व्याख्या असलेला मजकूर (पोस्ट) प्रसारित झालेला दिसला. याविषयी त्यांनी त्वरित त्यांच्या सहकारी अधिवक्त्यांना माहिती दिली. यामुळे न्यायालयातील सर्व अधिवक्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी एकत्र येऊन अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अमर सिंह यांना भेटून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. अधिवक्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हिंदुद्वेष्टे यामीन यांची सनद रहित करण्याची मागणी फिरोजाबाद बार असोसिएशनकडे केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn