Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीपट्टीद्वारे महर्षींनी ‘चि.सौ.कां. सायली गाडगीळ आणि चि. सिद्धेश करंदीकर यांच्या विवाह सोहळ्याला देवता, ऋषीमुनी आणि संत उपस्थित असतील’, या केलेल्या भविष्यवाणीनुसार आलेल्या अनुभूती

१. एका साधिकेला स्वप्नदृष्टांतामध्ये विवाह 
सोहळ्याला श्री अनंतानंद साईश उपस्थित असल्याचे दिसणे 
     ‘२५.४.२०१६ या दिवशी पहाटे ५.४५ वाजता मला जाग आली. नंतर मी परत झोपल्यावर मला स्वप्नात दिसले, ‘चि.सौ.कां. सायली गाडगीळ आणि चि. सिद्धेश करंदीकर यांचा विवाह चालू आहे. त्या प्रसंगी प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश हे सगुण रूपात सभागृहात फिरत आहेत आणि काही साधक त्यांची सेवा करत आहेत. तेव्हा त्यांचे रूप सनातनच्या ग्रंथावर छापलेल्या चित्राप्रमाणे (डोक्याला साईबाबांप्रमाणे भगवा रूमाल बांधलेला, भगवी कफनी परिधान केलेली आणि पांढरी दाढी असे) दिसत होते. ते पूर्ण सोहळ्याला उपस्थित असून त्यांना अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहेे. आजपर्यंत मला कधीही श्री अनंतानंद साईश यांचे स्वप्नात दर्शन झालेले नाही किंवा त्यांच्या संदर्भात मला कोणती अनुभूतीही आली नाही; परंतु वरील स्वप्नदृष्टांतामध्ये त्यांचे दर्शन झाल्यावर मला अतिशय कृतज्ञता वाटत होती.’
- सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०१६)
२. कडक उन्हाळा असूनही जीवनाडीपट्टीद्वारे महर्षींनी सांगितलेल्या 
भविष्यवाणीनुसार विवाह सोहळ्याच्या प्रसंगी गार आणि आल्हाददायक वातावरण असणे 
      ‘सध्या उन्हाळा आहे. चि.सौ.कां. सायली गाडगीळ आणि चि. सिद्धेश करंदीकर यांच्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी सभागृहात अनुमाने ३०० जण उपस्थित होते; पण वातानुकूलन यंत्र लावण्यात आले नव्हते, तरीही विवाह सोहळ्याच्या प्रसंगी देवता, ऋषिमुनी आणि संत यांच्या अस्तित्वामुळे उपस्थितांना गार आणि आल्हाददायक वातावरण असल्याची अनुभूती आली. वरील अनुभूतींद्वारे महर्षींची भविष्यवाणी सत्य ठरली. हिंदु धर्मातील भविष्यवाणीला थोतांड समजणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ही खरेतरच चपराकच आहे.’ - कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn