Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भावसत्संगामध्ये श्रीकृष्णाचे आणि प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे

कु. तृप्ती गावडे
      ‘देवाच्या कृपेने मला प्रतिदिन भावसत्संगात जाण्याची संधी मिळायची. त्या वेळी त्या सत्संगात देेवाच्या अस्तित्वाची अनुभूती येत असे. भावसत्संगात देवाने दिलेल्या अनुभूती पुढीलप्रमाणे आहेत. 
१. भावसत्संगासाठी श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टरांना 
सूक्ष्मातून येण्यासाठी याचक भावाने प्रार्थना करणे 
     ‘प्रतिदिन भावसत्संगामध्ये १० ते १२ साधकांची उपस्थिती असायची. आम्ही त्याप्रमाणे आसंद्यांची मांडणी करीत होतो. सगळे साधक सत्संगाला आल्यावर मी श्रीकृष्णाला आणि गुरुदेवांना प्रार्थना करीत होते, ‘हे गुरुदेवा, या प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही या भावसत्संगामध्ये तुम्हाला याचक भावाने बोलावत आहोत. हे देवा, आमच्यामध्ये भाव निर्माण होण्यासाठी, या देहात भावाचे बीज रोवण्यासाठी तुम्ही या आणि आम्हाला साहाय्य करा. या सत्संगात आरंभीपासून ते शेवटपर्यंत आम्हाला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे.’
२. भावसत्संगाला सगळे साधक येऊनही नेहमी एक आसंदी रिकामी 
रहाणे आणि त्या आसंदीत प.पू. डॉक्टर बसले असल्याचे जाणवणे 
     सत्संगात सगळे साधक येऊनही एक आसंदी नेहमी रिकामी रहायची. हे आम्हाला सत्संग संपल्यावर लक्षात यायचे. तेव्हा त्या आसंदीकडे पाहून ‘प.पू. डॉक्टर सत्संगात आले आहेत’, असा भाव जागृत व्हायचा. दुसर्‍या वेळी आसंद्या साधक संख्येप्रमाणे न लावता अंदाजे लावल्या होत्या. तरीही एक आसंदी रिकामी राहिली. त्या रिकाम्या आसंदीत साहित्य ठेवूया, असा विचार करून साहित्य ठेवायला लागल्यावर लक्षात यायचे की, त्या आसंदीत प.पू. डॉक्टर बसले आहेत; म्हणून साहित्य ठेवले जायचे नाही. सत्संग संपल्यावर एका साधिकेच्या लक्षात आले, आजही एक आसंदी रिकामी आहे. तेव्हा प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरांना पाहून आनंद होतो, तसे सगळे साधक गोड हसले. 
३. साधकाला साहाय्य करण्यासाठी प.पू. डॉक्टरांना मनातून 
कळकळून हाक मारणे आणि सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर सत्संगाला येऊन 
बसले असल्याचे साधिकेला जाणवणे अन् सत्संग संपल्यावर एका साधिकेने तसे सांगणे 
      त्यानंतर एका सत्संगात आढावा घेतांना मी सोफ्यावर बसले होते आणि माझ्या शेजारी एकासाठी जागा होती. तेव्हा कुणाचेही लक्ष त्या जागेकडे नव्हते. एक साधक भावाचे प्रयत्न बुद्धीच्या स्तरावर सांगत होता. त्या साधकाला कसे साहाय्य करायचे, ते कळत नव्हते. मी त्या साधकाचे बोलणे ऐकत असतांना प.पू. डॉक्टरांना मनातून कळकळून हाक मारली, ‘समोरचा साधक बुद्धीच्या स्तरावर सांगतो, तर तुम्हीच या आणि त्याला साहाय्य करा.’ त्या वेळी क्षणाचा विलंब न होता प.पू. डॉक्टर पांढरा सदरा घालून आलेले आणि ते माझ्या शेजारी बसलेले मला दिसले. ते बसणार म्हणून मी माझ्या शेजारी सोफ्यावर ठेवलेला पाऊच काढला आणि त्या साधकाला सूत्र सांगायला लागले. त्यानंतर त्या साधकालाही समजले आणि सूक्ष्मातील प.पू. डॉक्टरांना पाहून माझ्या मनावरचा ताणही अल्प झाला. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करून सत्संग थांबवला. सत्संग झाल्यावर एका साधिकेने सांगितले, ‘‘ताई, मला थोड्या वेळापूर्वी प.पू. डॉक्टर पांढरा शुभ्र सदरा घालून बसलेले दिसले.’’ ते ऐकून मनामध्ये कृतज्ञता वाढली. सलग एक मास प्रतिदिन भावसत्संग असायचा आणि त्यात नेहमी एक आसंदी रिकामी असायची. 
४. भावसत्संग घेतांना प्रतिदिन श्रीकृष्णाचे दर्शन होणे आणि 
स्वतः बोलत नसून श्रीकृष्ण बोलत असल्याचे जाणवणे 
     भावसत्संग घेतांना प्रतिदिन श्रीकृष्णाचे दर्शन व्हायचे. सत्संगाचे ठिकाण वेदपाठशाळेच्या सभागृहात असायचे आणि तिथे श्रीकृष्णाची प्रतिमा आहे. सगळे साधक आसंदीत बसल्यावर त्यांच्यामागे श्रीकृष्णाची प्रतिमा दिसायची. ‘सत्संगामध्ये मी बोलत नसून श्रीकृष्णच बोलत आहे’, असे वाटायचे. त्यानंतर त्या सभागृहात शिबीर चालू झाल्याने आम्ही दुसर्‍या सभागृहात सत्संगाला बसायचो. तेेेेव्हा तिथे बसल्यावर स्वागतकक्षातील श्रीकृष्णाची प्रतिमा दिसायची आणि तिच्याकडे आपोआप लक्ष वेधले जायचे. ‘मी सत्संगात आहे’, असे श्रीकृष्ण बोलल्याचे ऐकू यायचे. तेव्हा मी सगळ्यांना सांगायचे, ‘‘आपल्याला श्रीकृष्ण तिथून पहात आहे.’’ त्या वेळी ‘त्याला प्रत्यक्षात पहात आहोत’, असेच वाटायचे आणि पुष्कळ आनंद मिळायचा. 
५. प्रतिमेतील श्रीकृष्ण डोळ्यांनी बोलत असल्याचे जाणवणे आणि 
श्रीकृष्णाने भावाची निर्मिती होण्यासाठी प्रयत्नांचा आरंभ इंद्रियांपासून करण्यास सांगणे 
     एकदा सत्संगाला आरंभ करण्यापूर्वी मी एक निरोप देण्यासाठी स्वागतकक्षात गेले. त्या वेळी तिथे असणार्‍या श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे माझे लक्ष गेले. तेव्हा श्रीकृष्ण डोळ्यांच्या माध्यमातून माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. ‘भावसत्संगात आज तू आरंभी ‘डोळ्यांमध्ये भाव कसा निर्माण व्हायला पाहिजे’, ते सांग. साधक सत्संगात अवयवांच्या अडचणी सांगतील, तेव्हा प्रत्येक अवयवामध्ये भावाची निर्मिती होण्यासाठी प्रयत्नांचा आरंभ इंद्रियांपासून कर आणि तो विषय पुढच्या सत्संगात घे’, असे श्रीकृष्णाने मला सांगितल्याचे जाणवले. 
६. आधीच्या भावसत्संगात साधिकेने सूक्ष्मातून इंद्रियांची बैठक घेऊन त्यांना 
आढावा द्यायला सांगणे आणि साधिकेने डोळ्यांपासून इंद्रियांची अडचण सांगायला चालू केल्यावर 
श्रीकृष्णाने ‘डोळ्यांमध्ये भाव निर्माण करण्याविषयी आरंभी सांग’, असे सांगण्याचे कारण समजणे 
     प्रार्थना करून मी सत्संगाला आरंभ केला. आदल्या दिवशीच्या भावसत्संगात इंद्रियांची बैठक घेऊन त्याचा आढावा द्यायला सांगितला होता. आरंभी एका साधिकेने डोळ्यांविषयी सांगायला आरंभ केला. तिला तिचे डोळे म्हणाले, ‘माझ्यामध्ये अस्थिरता आहे. राग आला की, लगेच मोठे होतात. त्यांच्यामध्ये नम्रता किंवा लीनता नसते. त्या वेळी श्रीकृष्णाने मला जाणीव करून दिली, ‘तू कधी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचे किंवा तृप्तीचे (कु. तृप्ती गावडे हिचे) डोळे पाहिलेस का ? त्यांच्या डोळ्यांमध्ये किती स्थिरता आणि प्रेमभाव आहे. तसा तुझ्या डोळ्यांमध्ये येण्यासाठी प्रयत्न कर.’ त्या ताईंनी प्रत्येक इंद्रियांच्या अडचणीनुसार आढावा दिला. श्रीकृष्णाने सांगितल्यानुसार त्या साधिकेने डोळ्यांपासून इंद्रियांच्या बैठकीचा आढावा सांगितल्याचे लक्षात आले. 
७. ‘प्रत्येक अवयवात चैतन्य पुष्कळ प्रमाणात आहे’, याची 
मनाला जाणीव होईपर्यंत सांगत रहाण्याविषयी साधिकेने सांगणे 
    ‘देहातील प्रत्येक अवयव आणि इंद्रिय यांच्यामध्ये भाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे आपल्याकडून होणारी कृतीही योग्य आणि भावपूर्ण होईल. त्यासाठी दिवसातून २ ते ३ वेळा किंवा शक्य होईल तेव्हा आपण प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाची प्रतिमा यांच्याकडे पाहून ‘ईश्‍वराच्या प्रत्येक अवयवात किती चैतन्य आहे’, हे समजून घेऊन ते ग्रहण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, उदा. ‘डोळे ईश्‍वराने दिलेले आहेत. शरीर, हात, पाय आणि मनही ईश्‍वराने दिलेले आहे. त्यांत पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे’, ही जाणीव मनाला होईपर्यंत ते मनाला सांगत रहायचे. असे केल्याने आपल्याला अवयवांविषयी कृतज्ञ रहाता येऊन त्यांच्याकडून योग्य ती हालचाल होईल.’ हा सत्संग झाल्यावर असे वाटले, ‘मी काहीच बोलत नाही. समोरच्याला जे आवश्यक आहे, ते ईश्‍वर प्रत्येकाला देत असतो.’
- कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn