Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्यात वाढ करणार !

राज्य शासनाचा निर्णय
      मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - राज्य शासनाने हुतात्मा सैनिक आणि निमलष्करी सैनिक यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना ५ लक्ष रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यायचे. वर्ष २०१६-१७ वर्षामध्ये ते ८ लक्ष रुपये इतके करण्यात आले आहे. वर्ष २०१७ नंतर प्रत्येक वर्षी या रकमेमध्ये ५० सहस्र रुपयांची वाढ केली जाणार आहे. ही रक्कम हुतात्मा सैनिकांची पत्नी, आई-वडील यांना विभागून दिली जाणार आहे. सैनिकाला अपंगत्व आल्यास सध्या 
      १ ते ३ लक्ष रुपये एवढे आर्थिक साहाय्य दिले जाते. यात वाढ करून ती रक्कम सवा ते ४ लक्ष रुपये इतकी करण्यात आली आहे. वर्ष २०१७ पासून प्रतिवर्षी या आर्थिक साहाय्यामध्ये ५० सहस्र रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे. धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn