Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोलकाता येथे भाजपचे नेते मनीष शर्मा आणि ६ कोळसा माफिया यांना अटक !

बेहिशोबी ३३ लाख रुपये आणि ७ बंदुका जप्त सत्तेत नसतांना पक्षाचा एक नेता इतका बेहिशोबी पैसा बाळगतो, तर पक्षाच्या नेत्यांकडे किती बेहिशोबी पैसा असेल, याची कल्पना न केलेली बरी ! अशा राजकारण्यांची त्यांच्या नातेवाइकांच्या संपत्तीसह सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

   कोलकाता - भाजपचे नेते मनीष शर्मा यांना कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती पथकाने राणीगंज येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३३ लाख रुपयांच्या नोटा, ७ बंदुका आणि ८९ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. शर्मा यांच्यासह ६ कोळसा माफियांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मनीष शर्मा यांच्याकडून जप्त केलेल्या ३३ लाख रुपयांमधील सर्व नोटा २ सहस्र रुपयांच्या आहेत. काही दिवसांपूर्वी तमिळनाडूतही भाजपच्या नेत्याला बेहिशोबी नोटांसहित अटक करण्यात आली होती.
   वर्ष २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत मनीष शर्मा राणीगंज विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. मोठ्या रकमेच्या जुन्या नोटा पालटण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी कोलकात्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn