Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६९ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
       ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत. ‘भगवंताने ते समष्टीसाठी लिहून देण्याची बुद्धी दिली’, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘ते कृतीत आणण्यासाठी देवाने आमच्याकडून प्रयत्न करून घ्यावेत’, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !
१. वैचारिक स्तरावर
अ. ‘आपले ते योग्य’, अशी आपली विचारप्रक्रिया असेल, तर समोरच्याचे बोलणे आपण स्वीकारू शकत नाही.
आ. ‘आपल्याला जे वाटते, ते योग्य आहे का’, हे पडताळायला हवे. 
इ. स्वत:ला जे वाटते, त्यावर मन अडून रहात असेल, तर शिकता येत नाही. 
ई. इतरांविषयी नकारात्मकता निर्माण होणे, ही धोक्याची घंटा !
उ. नकारात्मक विचार केल्याने क्षमता संपते. 
ऊ. मनावर सतत अंकुश असेल, तर सातत्याने प्रयत्न होऊ लागतात. 
ए. ‘एखादे सूत्र आपण कशा पद्धतीने घेतो’, त्यावर पुढची प्रक्रिया अवलंबून असते. 
ऐ. अहं आपल्याला स्वत:चे निरीक्षणही नीट करू देत नाही. 
- श्री. संदेश नाणोसकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn