नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) - राज्याच्या शिक्षणामध्ये पालट करण्याचा प्रयत्न हा मुलांमध्ये गुणांची जोपासणे आणि शिक्षणाची गुणवत्तता वाढवणे यांसाठी आहे. शाळांमध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय पर्यायी ठेवण्याचा विचार असून त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय घेतांना राज्यातील कोणत्याही विषयाच्या शिक्षकाला बेरोजगार होऊ देणार नाही, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले. लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण खात्याविषयी अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यावर उत्तर देतांना ते बोलत होते.
तावडे पुढे म्हणाले की, राज्यातील शिक्षकांचा दर्जा वाढवून त्यांचा सन्मान होईल, असे कार्य शिक्षण खात्यातून केले जाईल. तसेच कोणत्याही शिक्षकांवर या शासनाच्या काळात अन्याय होणार नाही.
तावडे पुढे म्हणाले की, राज्यातील शिक्षकांचा दर्जा वाढवून त्यांचा सन्मान होईल, असे कार्य शिक्षण खात्यातून केले जाईल. तसेच कोणत्याही शिक्षकांवर या शासनाच्या काळात अन्याय होणार नाही.