Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मीरा-भाईंदर महापालिकेतील घरांच्या महाघोटाळ्यातील संबंधितांवर कारवाई व्हावी ! - नीतेश राणे

विधानसभा लक्षवेधी...
     नागपूर - मीरा-भाईंदर महापालिकेत गरिबांना युएल्सी अंतर्गत घरे बांधण्याच्या असलेल्या भूमींच्या धोरणाला हरताळ फासत त्यासाठी असलेल्या भूमी २८ खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी खोटी ओसी देऊन विकल्या, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला. विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सर्वांत मोठा शासकीय भूमीचा घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचेही ते म्हणाले. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि बनावट कागदपत्रे आणि भूमीची ओसी देणारे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना त्वरित बडतर्फ करावे आणि संबंधित विकासकांना काळ्या सूचीत टाकून त्यांच्यावर एम्आर्टीपी अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली.
    या प्रश्‍नावर नगरविकास राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले, घेवारे यांचे नाव समोर आल्यास त्यांची चौकशी केली जाईल. जर अपप्रकार समोर आला, तर त्यांना बडतर्फही केले जाईल. शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी या मोठ्या घोटाळ्याचे हे एक हिमनगाचे टोक असून मीरा-भाईंदर येथे बनावट कागदपत्रे सिद्ध करून मोठ्या प्रमाणात व्यवहार केला जात आहे, असे सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn